Subscribe Us

header ads

नगर रोड वरती रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य लोकप्रतिनिधीचा मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष!

बीड स्पीड न्यूज 


नगर रोड वरती रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य लोकप्रतिनिधीचा मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष!



बीड | प्रतिनिधी दि. 8 -: शहरातील नगर रोड वरती  खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना समोर जावं लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज ना आल्याने अनेक महिला शाळकरी मुले मुली व अनेक वाहनधारकांचा अपघात झाला आहे. हा रस्त्याच्या प्रश्न गंभीर असूनसुद्धा संबंधित अधिकरी लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत  आहे. या परिसरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, पंचायत समिती, जिल्हा पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, तहसील कार्यालय, रजिस्ट्री ऑफीस, जिल्हा आरोग्य कार्यालय, यासह अनेक शासकीय कार्यालय आहे. या सर्व शासकीय कार्यालयामध्ये शहरी व ग्रामीण भागातील लोकांचे कामे असतात यामुळे नगर रोड वरून नागरिकांची या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून रोज संबंधित अधिकरी व लोकप्रतिनिधी ये-जा करतात नगर रोड, सह शहरातील इतर महत्त्वाची रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अनेक तक्रारी करून सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांना अनेक समस्यांना समोर जावं लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक महिला शाळकरी मुले मुली व अनेक वाहनधारकांचा अपघात झाला आहे. हा रस्त्याच्या प्रश्न गंभीर असूनसुद्धा संबंधित अधिकरी व लोकप्रतिनिधी याकडेदुर्लक्ष करताना दिसत आहे. या खराब रस्त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा