Subscribe Us

header ads

श्री मनोज भैय्या लखेरा यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फराळ व ब्लॅंकेटचे वाटप

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फेरोज

श्री मनोज भैय्या लखेरा यांच्या  वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फराळ व ब्लॅंकेटचे वाटप
  
 
अंबाजोगाई प्रतिनिधी दि.२६ -: माजी उपनगराध्यक्ष श्री मनोज भैय्या लखेरा यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता भाऊ सरवदे मित्र मंडळ व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने जीवन आधार वृद्धाश्रम येथील वृद्धांना ब्लॅंकेट व फराळाचे वाटप करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष श्री मनोज भैय्या लखेरा हे एक सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम म्हणून धायगुडा पिंपळा येथील जीवन आधार वृद्धाश्रमा मध्ये श्री मनोज भैय्या लखेरा यांच्या हस्ते वृद्धांना ब्लॅंकेट व फराळाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी दत्ताभाऊ सरवदे व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने श्री मनोज भैय्या लखेरा यांचा भव्य सत्कार करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दत्ताभाऊ सरवदे हमीद चौधरी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय दादा रापतवार सचिव उमेश नाईक प्रतिष्ठानचे सदस्य माजी नगरसेवक सुनील व्यवहारे सुगत सरवदे सरवदे कन्स्ट्रक्शन चे जिजाराम सरवदे  संघपाल इंगळे   विक्रम कुरील राजकुमार लखेरा मयूर लखेरा शुभम लखेरा सनी लखेरा जीवन आधार वृद्धाश्रम चे पवन गिरवलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा