Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे बळीराजाचा सन पोळा उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे बळीराजाचा सन पोळा उत्साहात  साजरा



वाकनाथपूर प्रतिनिधी -: कोरोना महामारी मुळे गेले दोन वर्ष  कोणतेही सन उत्साहात साजरे होत नव्हते प्रत्येक सणाला निर्बंध लागू होते पण या वर्षी प्रत्येक सन उत्साहात साजरे होत आहेत. आज बैल पोला हा शेतकरी बांधव आणि शेतात त्यांच्या सोबत राबणारे बैल यांचा 

जिव्हाळ्याचा सन या दिवशी बळीराजा आपल्या बैलांना धुऊन रंग लावून अंगावरती झुल टाकून मोठया उत्साहाने वाजत गाजत गावातून मिरवत आणि गावातील मंदिराच्या भोवताली फेरे मारून मिरवणूक काढतात नंतर बैलांना पुरण पोळी चारून पूजा करतात अश्याच प्रकारे आज 

दिनांक २६ ऑगस्ट वार शुक्रवार रोजी बीड तालुक्यातील मौजे वाकनाथपुर येथे शेतकऱ्याने बैल पोळा मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. शेतकरी बांधव संबंध आयुष्य काबाड कष्ट करतात कधी निसर्गाच्या लहरीपणाचं तर कधी स्वतः च्या कर्जाचं ओझं वाहतात त्यांच्या या संकटाच ओझं बैल देखील वाहतात म्हणून तर बैलपोळा हा सण शेतकरी राजा मोठया उत्सवाने साजरा करतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा