Subscribe Us

header ads

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची परळी औष्णिक विद्युत केंद्रास भेट

बीड स्पीड न्यूज 




दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची परळी औष्णिक विद्युत केंद्रास भेट

परळी |प्रतिनिधी -: परळी वैजनाथ येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यंनी शैक्षणिक सहलीचा भाग म्हणून दि २४ ॲागस्ट बुधवार रोजी परळी औष्णिक विद्युत केंद्रास दिली. शाळेतील ८ वी, ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाच्या संकल्पना प्रत्यक्षात पहायला मिळाव्या या हेतूने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.या भेटी दरम्यान मुलांना 250 मॅगावॅटचा थर्मल प्लांट, २४ तास वाफेवर चालणाऱ्या टरबाईन, जल शुद्धीकरण प्रकल्प, कुलींग टॅावर, बॅायलर, 

ग्रीन कोल इत्यादी संचामधील प्रक्रिया प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली. या भेटी दरम्यान मुख्य अभियंता श्री मोहन आव्हाड साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यकारी अभियंता आर.एस.कांबळे, सहाय्यक अभियंता जयवर्धन सुर्यवंशी, सहाय्यक अभियंता उमेश चंद्रपिकले, अनिल मुंडे, बालाजी सुरवशे आदी उपस्थित होते. अशा प्रकारची शैक्षणिक सहल आयोजन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांनी विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते व प्राचार्य श्री विठ्ठल तुपे सर यांचे आभार मानले. शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी गणेशी पोपटानी, अनिता रूरकर, स्वागत रोकडे, सालिक बोडके, राजीव झालझो, रवि कराड यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा