Subscribe Us

header ads

बीडमध्ये दोन हजार पीआर कार्ड चा घोटाळा!


 बीडमध्ये दोन हजार पीआर कार्ड चा घोटाळा!


बीड | प्रतिनिधी -: जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ  बोर्डाच्या हजारो एकर जमिनींचे बेकायदा हस्तांतरणाचे प्रकार समोर आल्यानंतर आता बीड शहरातील देखील दोन हजारांवर बोगस पीआर कार्ड असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे कागदपत्रेच सादर केले आहे. मागच्या काळात जिल्हाभरातील विविध हिंदू देवस्थाने आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींचे बेकायदे हस्तांतरणके ल्याचे प्रकार समोर आले होते. यात तत्कालीन अधिकाऱ्यांसह विद्यमान अधिकाऱ्याची साखळी समोर आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर अनेक ठिकाणी जमिनींचे हस्तांतरण रद्द करण्यात आले. मात्र आता या नंतर बीड शहरातील मालमत्तांचे बोगस पीआर कार्ड तयार केल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांने समोर आणला आहे. मालमत्तांचे जे व्यवहार झाले, त्या व्यवहारांची मूळ संचिका भुमि अभिलेख कार्यालयाकडे नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. या घोटाळ्यात भूमाफियांसह अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे. संचिका नसताना पीआर कार्ड बनविले कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाने वादग्रस्त असलेले दोन हेक्टर ८०  गुंठे क्षेत्र असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या सर्व जागेची परस्पर विक्री केली जात असल्याचेही समोर आले आहे. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असू शकतो, असा आरोपही त्यांनी केला. या तक्रारी केल्यानंतर पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचेही रामनाथ खोडे यांनी म्हटले आहे. पोलिसांकडून आतापर्यंत पाच ते सहा नोटिसा बजावण्यात आले आहेत. यापूर्वी रामनाथ खोड यांनी देवस्थानच्या जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याप्रकरणी कायदेशीर लढाई लढली. जिल्हाधिकाऱ्यांपासुन ते आयुक्त आणि कोर्टच्या पायर्‍याही चढल्या आता त्यांनी बोगस पीआर  कार्डचे प्रकरण समोर आणल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला. पीआर कार्ड दिले तर त्याची संचिका कुठे आहे हे भूमी अभिलेख कार्यालयाने दाखवावे. आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. आपण पाठपुरावा करत राहणार. मात्र माफिया व अधिकाऱ्यांच्या साखळीकडून आपल्यावर पोलिसांकडून दबाव आणला जात आहे.


         -  रामनाथ खोड, सामाजिक कार्यकर्ते, बीड.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा