Subscribe Us

header ads

जातीय दंगलीतील शाहबाज शाह खून प्रकरणाचा आरोपी दिपजित महाजन यास जामीन देण्यास खंडपीठाचा नकार

बीड स्पीड न्यूज 

जातीय दंगलीतील शाहबाज शाह खून प्रकरणाचा आरोपी दिपजित महाजन यास जामीन देण्यास खंडपीठाचा नकार 

बीड | प्रतिनिधी- दोंडाईचा येथील जातीय दंगलीत शाहबाज शाह खून प्रकरणात अटक आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी अवचट यांनी जामीन देण्यास नकार दिला आहे.दिनांक 31.03.2021 रोजी दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे दोन समाजात जातीय दंगल घडली होती. ज्यामध्ये अनेक जण जखमी होवून शाहबाज शाह गुलाब शाह (वय 51 वर्षे) यांचा र्निदयीपणे खून करण्यात आला होता. म्हणून सदरील खूनाप्रकरणी आरोपी दिपजित महाजन, चेतन राजपुत, युवराज पहलवानसह त्यांचे सोबत असलेले इतर 13 जणांविरुध्द भादंविचे कलम 302, 143, 147, 148 व 149 प्रमाणे दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटक असलेला आरोपी दिपजित महाजन याने सुरुवातीला सत्र न्यायालय, धुळे येथे जामीन अर्ज दाखल केला. दिनांक 31.03.2022 रोजी सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी महाजन याने खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. यामध्ये मयत शाहबाज शाह यांच्या विधवा/पत्नी अफसाना शाह यांनी ॲड.सईद एस शेख यांच्यामार्फत फौजदारी अर्ज दाखल करून आरोपीच्या जामीनास आक्षेप घेतला. तसेच अभियोग / सरकारी पक्षाच्यावतीनेही आरोपीच्या जामीनास विरोध दर्शविण्यात आला. सदरील जामीन अर्जावर खंडपीठात वेळोवेळी सुनावणी झाल्यानंतर प्रकरणाचे गांभिर्य तसेच शाहबाज शाह यांच्या खूनात आरोपीच्या भुमिकेची नोंद आणि सर्व पक्षांचे युक्तीवाद ग्राह्य धरत खंडपीठाने आरोपी दिपजित महाजन यास जामीन देण्यास नकार दिला. सदरील प्रकरणी मयत शाहबाज शाह यांच्या पत्नी अफसाना शाह यांच्यावतीने जामीनास आक्षेप घेण्यासाठी अॅड.सईद एस शेख यांनी बाजु मांडली. त्यांना अॅड. नदीम अन्सारी (धुळे) यांनी सहकार्य केले. तर शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एस पी सोनपावले यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा