Subscribe Us

header ads

गोपाळपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार! दोषी अधिकार्यांची उच्चस्तरीय चौकशी करा!-शिवसेना

बीड स्पीड न्यूज 


गोपाळपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार!
दोषी अधिकार्यांची उच्चस्तरीय चौकशी करा!-शिवसेना

मा.आमदार सुनिल धांडे  यांच्या उपस्थितीत धारूर तहसिलदार यांना निवेदन 

किल्ले धारूर/प्रतिनिधी-: धारूर अतंर्गत मौजे गोपाळपूर  ग्रामपंचायत मार्फत पंधराव्या वित्त आयोगा मधून करण्यात आलेल्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करणे बाबत.तहसिल कार्यालय धारूर यांना शिवसेना मा.आमदार प्रा.सुनिलजी धांडे व शिवसेना तालुका सचिव बाबासाहेब सराफ यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.मागील पाच वर्षापासून गोपाळपूर ग्रामपंचायतीने अनेक प्रकरणांची चौकशी दडपल्या जात आहे. वाढत्या भष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची शिवसेनेने मागणी केली आहे.यामध्ये:- १)दूर फवारणी मेडिक्लोर ब्लेचिंग २)पथदिवे खरेदी दुरुस्ती ३)मुतारी बांधकाम शौचालय बांधकाम व दुरुस्ती ४)स्वच्छता कोविड उपाय योजना ५)वृद्धासाठी बाक खरेदी६)एलईडी दिवे दुरुस्ती करणे ७)शिक्षक कॉलनी कच्चा रस्ता तयार करणे ८)पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती करणे ९)नवीन स्त्रोत पाणीपुरवठा करणे१०) गाव अंतर्गत पाईपलाईन करणे ११)जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हैद बांधकाम १२)भुयारी गटारी करणे १३)नालीसफाई१४) वृक्ष लागवड१५) टीसीएल पाणीपुरवठा दुरुस्ती १६)सार्वजनिक आरोग्य दिवाबत्ती परिसर स्वच्छता सांस्कृतिक खर्च १७)पथदिव्य दुरुस्ती या बाबीवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून सदर भ्रष्टाचाराची उच्चस्तरिय चौकशी करण्यासाठी मा.आमदार सुनिल धांडे व शिवसेना तालुका सचिव बाबासाहेब सराफ यांच्या हस्ते धारूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.3आक्टोबर पासून दखल न घेतल्यास आमरण उपोषणाला बसणार असलेला इशारा दिला आहे.यावेळी:-शिवसेना माजी तालुकाप्रमुख विनायक ढगे,शिवसेना तालुका सचिव बाबासाहेब सराफ सुनील भामरे,विकास काजळे अभिषेक भारस्कर,विजय भारस्कर बापूराव वराडे,विशाल सराफ,लखन राऊत,इमरान सय्यद,विशाल काजळे ,दत्ता खैमुळे ,शिदेश्वर भारस्कर,माऊली अण्णा भारस्कर ,अविनाश पिंपळे,अशोक भारस्कर काजळे,तुकाराम भारस्कर गणेश भारस्कर,पवन मस्के,अशोक फुटाणे,या वेळी ,संभाजीनगर,वडारवाडा,शिक्षक काॅलनी, गोपाळपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा