Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाचा हेरिटेज वॉक मध्ये सहभाग

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयाचा हेरिटेज वॉक मध्ये सहभाग

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी हेरिटेज वॉक (वारसा मुशाफिरी) मध्ये सहभाग घेतला. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी  पय॔टन विभाग, पुरातत्त्व विभाग व इतिहास संकलन समिती,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य संरक्षित स्मारक कंकालेश्वर मंदिर बीड येथे हेरिटेज वॉक (ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणे) चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाम गदळे महाविद्यालय दहिफळ वडमाऊली इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ.शांता जाधवर(गीते)यांनी पर्यटन दिनीचे महत्व, पर्यटना मध्ये इतिहास विषयातील विद्यार्थ्यांना असलेल्या संधी तसेच कंकालेश्वर मंदिराचे स्थापत्य व शिल्पांची माहिती दिली. ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली व मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे इतिहासाचे  प्राध्यापक डॉ. शेख हुसेन इमाम, प्रा.नागनाथ सोळुंखे, प्रा. पसारकर, श्री. बावणे तसेच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शेख कलीम यांची सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ.हुसैन एस एस, पदव्युत्तर संचालक प्रा. फरीद नहरी आयक्यूएसी समन्वयक डॉ. अब्दुल अनीस यांनी इतिहास विभागाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा