Subscribe Us

header ads

उपेक्षित,वंचीत,कष्टकरी, कामागारांच्या न्याय हक्कसाठी सदैव कार्यरत राहण हेच ध्येय -- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


उपेक्षित,वंचीत,कष्टकरी, कामागारांच्या न्याय हक्कसाठी सदैव कार्यरत राहण हेच ध्येय -- नगरसेवक अँड विकास जोगदंड

महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत कामगारांना प्रत्येकी वीस हजार दिवाळी भत्ता द्या भिम स्वराज्य कामगार संघटनेची मागणी

बीड (प्रतिनिधी) 26 सप्टेंबर उपेक्षित, वंचीत, कष्टकरी, कामगार सर्वच बाजूने पिचलेला समूह असून भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार समूहाला संविधानातून संविधानात्मक हक्क आणि अधिकार देऊन त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा म्हणून विकासाची तरतूद केली. असल्याचे भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष,तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी भिम स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा साहित्य वाटपा प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. पुढे संबोधित करताना श्री जोगदंड म्हणाले की भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल, असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते त्यांनी कामगारांच्या उत्कर्षांची द्वारे खुली केली आपण त्यांचे अनुयायी असून आपण देखील कायम उपेक्षित,वंचीत,कष्टकरी, कामागारांच्या न्याय हक्कसाठी कार्यरत राहणार असून हेच आपले ध्येय असल्याचे सांगत दसरा व दीपावली निमित्त महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत कामगारांना प्रत्येकी वीस हजार दिवाळी भत्ता देण्यात यावा अशी भिम स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच कामगार मंत्री यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक नाना (मामा) कदम,भिम स्वराज्य कामगार संघटनेचे मुख्य प्रवर्तक मंगेश जोगदंड,जाधव,महादेव जोगदंड,साहिल गायकवाड,आदर्श जोगदंड, आदित्य जोगदंड,सह कामगार बांधव उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा