Subscribe Us

header ads

नवरात्र महोत्सवात खंडेश्वरी यात्रेसाठी शहरवासीयांसाठी बस सेवा सुरू करा - संपादक नितेश उपाध्ये

बीड स्पीड न्यूज 


नवरात्र महोत्सवात खंडेश्वरी यात्रेसाठी शहरवासीयांसाठी बस सेवा सुरू करा - संपादक नितेश उपाध्ये

बीड (प्रतिनिधी) नवरात्र महोत्सवानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन त्यांना नवरात्र महोत्सवात बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी याविषयी त्यांच्याशी चर्चा देखील झाली याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासंदर्भात सूचना दिल्या व याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असे देखील त्यांनी आम्हाला अश्वस्त केले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की येणाऱ्या 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र महोत्सव होणार आहे. याबाबत प्रशासनाकडून या नवरात्र महोत्सवा विषयी वेगवेगळ्या उपाययोजना दरवर्षी केल्या जातात परंतु याच उपाय योजनेत मागील काही वर्षापासून पालवन चौक ते खंडेश्वरी या दरम्यान सुरू असणारी बस सेवा बंद करण्यात आली आहे. ही बस सेवा एसटी महामंडळाकडून देण्यात येत होती याबाबत आपण शहरवासीयांसाठी 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत खंडेश्वरी देवी यात्रेसाठी शहरात बस सेवा सुरू केली तर यात एसटी महामंडळाचा देखील फायदा होईल आणि भाविक भक्तांना देखील बस मुळे त्यांच्या देखील खिशाला कात्री बसणार नाही आणि या उत्सवात मोठ्या प्रमाणावर महिला देखील सहभागी असतात त्यामुळे त्यांना देखील सुरक्षित प्रवासाची सोय होईल म्हणून याबाबत आपण निर्णय घेऊन शहरवासीयांसाठी नवरात्र महोत्सवात खंडेश्वरी देवी येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे नितेश उपाध्ये यांनी केली आहे. यावेळी अँड. विलास जोशी, पत्रकार संजय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा