Subscribe Us

header ads

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पत्रकारिता व सामाजिक कार्याचे पुरस्कार रहेमान सय्यद यांना प्रदान

बीड स्पीड न्यूज 


माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पत्रकारिता व सामाजिक कार्याचे पुरस्कार रहेमान सय्यद यांना प्रदान 

कडा (प्रतिनिधी) बहुजन ग्रामविकास सेवा संघ महाराष्ट्र राज्य मार्फत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. दर वर्षी राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने  राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आष्टी तालुक्यातील कडा येथिल सय्यद रहेमान सय्यदअली यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा राज्यस्तरीय समाजभूषण अवार्ड २०२२ पत्रकारिता व सामाजिक कार्याकरिताचा पुरस्कार पत्रकार रहेमान सय्यद यांना माजी मंत्री बबनराव (दादा) पाचपुते सौ.प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१३ आँक्टोबर २०२२ गुरुवार रोजी काष्टी जि.अहमदनगर येथे दुपारी १ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी मंत्री बबनराव (दादा) पाचपुते यांनी भूषविले. रहेमान सय्यद यांनी कायमच सामाजिक कार्यात व पत्रकारिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेत. मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय समाजभूषण अवार्ड २०२२ हे पुरस्कार रहेमान सय्यद यांना प्रदान करण्यात आले. यावेळी बहुजन ग्रामविकास सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गवांदे,उपप्रदेशाध्यक्ष एस.डी.नागवंशी, सचिव रामनाथ बोऱ्हाडे, महेंद्र सोनवणे,अहमदनगर जि.प.स्थायी समितीच्या पंचशिला रमेश गिरमकर,अजहर पानसारे,साहेबराव उडे, नवनाथ जोधळे सह आदि.मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल रहेमान सय्यद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा