Subscribe Us

header ads

मिल्लीया महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

बीड स्पीड न्यूज 


मिल्लीया महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी 

बीड: येथील मिल्लीया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद  हनीफ तर प्रमुख अतिथी म्हणून नवगण महाविद्यालय परळी येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. झांजे बबनराव जगन्नाथराव तसेच उपप्राचार्य डॉ.हुसैनी एसएस, इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शेख कलीम मोहिउद्दीन, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफिक, प्रोफेसर डॉ. मिर्झा असद बेग, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन, पदव्युत्तर संचालक प्रा.फरीद नहरी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेख हुसेन इमाम यांनी केले. प्रमुख अतिथी डॉ. झांजे बी.जे. यांनी महात्मा गांधीजींचा अहिंसेचा खरा अर्थ, दक्षिण आफ्रिकेतील काळा-गोरा भेद, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींचे योगदान व त्याच्या जीवन कार्यावर सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळवून दिले व स्वच्छतेचा संदेश दिला असे सांगितले. इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शेख  कलीम मोहिउद्दीन यांनीही महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी दिलेल्या योगदाना बद्दल सांगितले. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते इतिहास विभागातर्फे घेण्यात आलेल्या इतिहास सामान्य ज्ञान स्पर्धा  मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ. शेख कलीम मोहिउद्दीन यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर डॉ. मिर्झा असद बेग यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास  फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा