Subscribe Us

header ads

पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

बीड स्पीड न्यूज 


पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

दिंद्रुड | परतीच्या पावसाने नदी नाले भरून वाहत आहेत काल दिंद्रुड येथे जोरदार पाऊस पडला जोरदार पाऊस पडल्याने  शिरसाळा मोहा येथिल एका ओढ्याला पुर आला या ओढ्यात  शुक्रवार दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान तीन तरुणाने जीप ओढ्यात घातली ओढ्याला जास्त पाणी असल्याने जीप सह जीप मधील तीन तरूण शेख रईस अन्सर अत्तार.शेख अखील अत्तार.आणि दीपक चोरघडे.पाण्यात बुडाले काही ग्रामस्थांनी मिळून जीप मधील तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन तरुण. शेख अखील अत्तार. आणि दीपक चोरघडे  या दोघांना वाचवण्यात यश आले. परंतु शेख रईस अन्सर अत्तार हा तरूण वाहुन गेला गावातील नागरिकांनी आणि अग्निशामक दलाने सदर तरुणाचा शोध घेण्यास सुरूवात केली परंतु पावसामुळे आणि पाण्यामुळे शोधकार्यस अडथळा येत होता. दरम्यान आज शनिवार सकाळी शेख रईस अन्सर अत्तार याचा मृतदेह घटनेपासून काही अंतरावर बंधाऱ्यातील गाळात आढळून आला. सदर तरुणाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठीं पाठविण्यात आला घटनास्थळी धारुरचे तहसीलदार दत्ता भारस्कर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी राजदीप बनसोड हे घटनास्थळी दाखल होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा