Subscribe Us

header ads

इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाने साजरा होणार-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाने साजरा होणार-- ॲड. प्रा. इलियास इनामदार 


बीड प्रतिनिधि : देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव साजरा होणार आहे नऊ नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्र सेनानी जागतिक पातळीचे राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांची जयंती आहे, दहा नोव्हेम्बरला इंग्रजांचे कर्दनकाळ शहीद ए आज़म हज़रत टीपू सुलतान रहेमतुल्लाह अलैह यांची जयंती आहे व अकरा नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्रता सेनानी देशाची एकता अखंडता कायम राखणारे व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती आहे या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना व शहीद टीपू सुलतान जयंती उत्सव समिती च्या वतीने इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करणार अशी माहिती समिती निमंत्रक व लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे. सविस्तर असे की पुढील नोव्हेम्बर महिन्यात नऊ नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्र सेनानी जागतिक पातळीचे राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांची जयंती आहे, दहा नोव्हेम्बरला इंग्रजांचे कर्दनकाळ शहीद ए आज़म हज़रत टीपू सुलतान रहेमतुल्लाह अलैह यांची जयंती आहे व अकरा नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्रता सेनानी देशाची एकता अखंडता कायम राखणारे व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती आहे या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करणार जसे उर्दू मुशायरा, रक्तदान शिबिर, इक़बाल टीपू आज़ाद विषयावर निबंध स्पर्धा, सूफ़ी लंगरखाना (गरीब गरजू लोकांना अन्नदान), राष्ट्रपुरुषांच्या विषयी माहिती प्रदर्शन, इक़बाल टीपू आज़ाद कांफ्रेंस व बक्षीस वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाने महोत्सव साजरा होणार आहे विशेष म्हणजे हे महोत्सव दारू नशापाणी न करता डी जे मुक्त कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमा मागचा हेतू देशाच्या राष्ट्रपुरुषा बद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी समाजामध्ये बंधुभाव समता एकता राष्ट्रप्रेम वाढिस हाथभार लागेल व समाजामध्ये जागृति व्हावी हा हेतू आहे पुढील नियोजनासाठी सार्वजनिक बैठक लवकर घेण्यात येईल अशी माहिती शहीद टीपू सुलतान जयंती उत्सव समिती निमंत्रक व लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, खैसर बेग, सुफियान मणियार, ॲड. कलीम काज़ी, मौलाना ज़फर काज़ी, गुलाम साकिब सर, मिर्ज़ा नदीम बेग, संजय खांडेकर, अतीख अहमद खान, शेख अयाज़, शेख समीर, इंज़माम काज़ी, शेख साबेर, समीर पटेल, नाज़ीम बेग, रज़ी भैय्या नदीम मेंबर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे माहिती दिली आहे.
                                 
                   
                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा