Subscribe Us

header ads

टोकवाडी ग्रामपंचायतची नवीन प्रभागनिहाय पारूप मतदारांच्या याद्यावर ; गावातील 34 जणांचे हरकती व आक्षेप

बीड स्पीड न्यूज 


टोकवाडी ग्रामपंचायतची नवीन प्रभागनिहाय पारूप मतदारांच्या याद्यावर ; गावातील  34 जणांचे हरकती व आक्षेप

टोकवाडीत घर तेथे मतदान अशी नूतन प्रभाग रचना करा- संजय मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने  ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम जाहिर झाला. प्रसिद्ध झालेल्या मतदान याद्यावर गावातील 34 जणांनी हरकती व आक्षेप नोंदविला आहे. टोकवाडी येथील नविन प्रभाग रचनेनुसार घर तेथे मतदानाची  ना नोंदणी करणे व नवीन याद्या तयार करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपलेल्या परळी तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम जाहिर झाला असुन दि.13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान दावे,हरकती स्वीकारण्यात येणार असुन दि.21 ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे टोकवाडी ता. परळी-वैजनाथ जि. बीड च्या ग्रामपचायत सार्वजनिक निवडणुक कार्यक्रम २०२२ च्या नविन प्रारूप आराखडा मतदार यादी वाचन संदर्भात दिनांक : १३.१०.२०२२ रोजी प्रभाग रचना करत असतांना याद्यामध्ये बरेच मतदार जेथे घर आहे त्या प्रभागात त्यांचे मतदान नसुन दुसऱ्या प्रभागात नवे समाविष्ठ झालेले निदर्शनास आलेले आहे, त्यामुळे आम्हा गावकऱ्यांचा प्रभाग रचना व प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर आक्षेप असुन नविन प्रारूप आराखडा घरोघरी जावुन घर तेथे मतदान अश्या स्वरुपात प्रारूप आराखडा तयार करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. यामध्ये संजय भास्करराव मुंडे, सुग्रीव रामभाऊ मुंडे, वाल्मीक मच्छिंद्र मुंडे, तुकाराम ज्ञानोबा मुंडे, संजय श्रीराम मुंडे, धोंडीराम दादाराव रोडे,  प्रकाश गंगाधरराव आळे, राजाभाऊ रामकिशन मुंडे, जगन्नाथ प्रभू मुंडे, सुखदेव विठ्ठल मुंडे, गणेश गुणवंत मुंडे, बालाजी वैजनाथ आघाव, विनोद साहेबराव मुंडे, प्रल्हाद माणिक जगताप नामदेव विठ्ठल मुंडे, तुकाराम मारुती मुंडे, मीनानाथ व्‍यंकटी मुंडे, प्रदीप प्रल्हाद घुले, विठ्ठल वैजनाथ साबळे, गणेश संपत्ती मुंडे, हनुमंत दत्तु घोबाळे, राम हनुमंत मुरकुटे, गौरव प्रभू आघाव, पांडुरंग भीमराव मुंडे, भरत प्रभू मुंडे, उत्तम महादेव आघाव, विजय त्रिंबक मुंडे, अभिमान विठ्ठल रोडे, अनंत मनोहर मुंडे, अनिल बालासाहेब जाधव, राजेश भास्कर मुंडे, हनुमंत मधुकर मुंडे, तुकाराम अंगद मुंडे, पंडित संभाजी रोडे व इतर जणांनी मतदार याद्यावर आक्षेप नोंदवला असून त्यात बहुतांश प्रभाग, वॉर्डात नावात बदल झाल्याचे आक्षेप अधिक आहेत. टोकवाडी ग्रामपंचायतची नवीन प्रभागनिहाय पारूप मतदारांच्या याद्याची फेर रचना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा