Subscribe Us

header ads

मातंग समाजाने डेमोक्रॅटिक पार्टीचा कास्ट बेस बनावे- अजिंक्य (भैय्या) चांदणे

बीड स्पीड न्यूज 

मातंग समाजाने डेमोक्रॅटिक पार्टीचा कास्ट बेस बनावे- अजिंक्य (भैय्या) चांदणे

फुले आंबेडकरवाद हीच डेमोक्रॅटिक पार्टीची विचारधारा-प्रा. सुकुमार कांबळे 


बीड (प्रतिनिधी) भारत देशातील प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला जातीचा बेस आहे. तर डीपीआय लोकशाही मानणारा पक्ष असल्याने मातंग समाजाने डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा कास्ट बेस बनावे असे प्रतिपादन डी. पी.आय. प्रदेशाध्यक्ष अजिंक्य (भैय्या) चांदणे यांनी स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यकर्ता पदाधिकारी संवाद व शिबिरात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, संघटन वाढवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे, राज्यभरात पक्ष मोठ्या ताकतीने वाढत आहे लवकरच पक्षाचे शक्तिप्रदर्शन महाराष्ट्राच्या समोर करू!- राज्यभरात डेमोक्रॅटिक पार्टीचे हजारो प्रशिक्षित कार्यकर्ते महाराष्ट्राच्या समोर येतील अशी तयारी करत आहोत. हॉटेल यशराज इन जालना रोड बीड येथे आयोजित कार्यकर्ता पदाधिकारी संवाद व शिबिराचे उद्घाटन डी पी आय राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार, डी.पी. आय. राज्य सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे राज्य युवक कार्याध्यक्ष सुरज साठे, डीपीआय संसदीय सदस्य एस. के. ऐवाळे, बीड युवक अध्यक्ष सोहम लोंढे, प्रा. डॉ. चंद्रकांत साळवे आणि प्रा. डॉ. रमेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अजिंक्य भैय्या म्हणाले की कोणत्याही संघटनेचे तथा पक्षाचे भवितव्य त्यांच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असते. मी डीपीआईचा एक सेनापती असून समाजाला परिवर्तनाच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराकडे घेऊन जात आहे. सेनापती लाचार झाला तर त्यांचे सैनिक, समाज लाचार आणि दारिद्र्यात जातो. मी ठरवले तर दोन वर्षात मला पद प्रतिष्ठान मिळेल परंतु माझा समाज स्वाभिमानाने उभा होण्याऐवजी लाचार होईल ही डीपीआईचा एक कार्यकर्ता म्हणून मला कदापिही मान्य नाही. महाराष्ट्रातील दलित, शोषित, कष्टकरी, कामगार, महीला यांच्या न्याय हक्कासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हाच पक्ष राजकीय पर्याय असू शकतो असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा. सुकुमार कांबळे सर यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, येणारा काळ डीपीआय साठी उज्वल भविष्य घेऊन येणार आहे. स्मृतीशेष आत्माराम चांदणे आणि मी उभा केलेला पक्ष खंबीर नेतृत्व असणाऱ्या अजिंक्य भैय्या कडे सोपवीला आहे. डीपीआय म्हणजे स्वाभिमान तर जय भीम म्हणजे आमचा श्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले. या शिबिराचे प्रास्ताविक बीड जिल्हाध्यक्ष सुभाष लोनके आणि अमोल शेरकर यांनी केली तर आभार प्रदर्शन युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटोळे यांनी केले. यावेळी प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीड पूर्व जिल्हाध्यक्ष सुभाष लोनके, बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष अमोल शेरकर, पश्चिम युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटोळे आणि बीड पूर्व युवक जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा