Subscribe Us

header ads

जिल्हा रेशीम कार्यालयातील शेतकऱ्याची आर्थिक व मानसिक पिळवणुक जिल्हाधिकारी यांना निवेदनशेख युनूस चन्हाटाकर

बीड स्पीड न्यूज 

जिल्हा रेशीम कार्यालयातील  शेतकऱ्याची आर्थिक व मानसिक पिळवणुक जिल्हाधिकारी यांना निवेदन
शेख युनूस चन्हाटाकर 
 

बीड | प्रतिनिधी-: जिल्हा रेशीम कार्यालयात शेतकऱ्याची आर्थिक लूट होत असताना सुद्धा अधिकारी बघायचीच भूमिका घेत  आहे चेक साठी पैशाची मागणी होत आहे पैसे दिले तरच चेकची पूर्तता होते ती आर्थिक लूट थांबवावी व ते अधिकारी विरुद्ध कारवाई करण्यात यावी इतर मागण्यासाठी शेख युनूस चन्हाटाकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की , जिल्हा रेशीम कार्यालय , बीड येथील क्षेत्र सहाय्यक श्री.सोनटक्के हे जिल्हा रेशीम कार्यालयात कार्यरत असून त्यांच्या कडे परळी , अंबाजोगाई , धारूर , वडवणी , गेवराई तालुक्याच्या कार्यभार असून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडुन काम मंजूर करणे , व मंजुर करणे व पोखरा योजने कामांना ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कामांसाठी पैशांची मागणी करतात तसेच पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत ते शेतकन्याची आर्थिक व मानसिक पिळवणूक करत आहे . पोखरा योजनेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता संबंधितांनी कार्यक्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नाहरकत प्रमाणपत्र देणे अपेक्षित असताना श्री . सोनटक्के कार्यक्षेत्रावर न जाता रेशीम कार्यालयात बसूनच पाच - दहा हजार रुपयांनी मागणी करून प्रमाणपत्र तयार करुन देतात . जिल्हयातील रेशीम शेतकऱ्यांचे कुशल बिले रेशीम कार्यालयातुन चेक व्दारे वाटप केली जातात सदरील चेक वाटप करतात देखील 500 / - रुपये घेतल्याशिवाय श्री . सोनटक्के हे चेक वाटप करत नाहीत . सदरील बाब माहीत असुन देखील जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री . पवार साहेब हे सोनटक्के यांना पाठीशी घालुन जानीव पुर्वक सहा ते सात तालुक्याचा कार्यभार देऊन श्री . सोनटक्के यांच्यामार्फत श्री . पवार हे जिल्हयात मोठ्या प्रमाणात रेशीम शेतकन्याची आर्थिक लुट होत असल्याची चर्चा रेशीम शेतकऱ्यात होत आहे . जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की , जिल्हा रेशीम कार्यालयाकडून शेतकन्याची होणारी आर्थिक • पिळवणूक थांबण्यासाठी सदरील प्रकरणात आपण स्वतः लक्ष देऊन सोनटक्के यांच्या सर्व कार्यभर काढून घ्यावा व त्यांना निलंबित करावे  अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले एईल असा इशारा निवेदन द्वारे  शेख युनूस चन्हाटाकर यांनी केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा