Subscribe Us

header ads

मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे डॉ.संतोष मुंडेच्या हस्ते होणार उद्घाटन ; शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा- विश्वजीत मुंडे

बीड स्पीड न्यूज 


मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे डॉ.संतोष मुंडेच्या हस्ते होणार उद्घाटन ; शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा- विश्वजीत मुंडे 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील सिद्धेश्वर नगर भागात मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे कान,नाक, घसा तज्ञ डॉक्टर संतोष मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान यशदायिनी प्रतिष्ठानचे सचिव विश्वजीत मुंडे यांनी केले आहे.शहरातील स्वराज्य चौक सिद्धेश्वर नगर येथे यशदायिनी प्रतिष्ठान आयोजित मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे शहरातील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ श्रीनाथ हॉस्पिटल  तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. दतचिकित्सक डॉ. शुभम लाहोटी, डॉ. पवन सावंत, नेत्रा चिकित्सक डॉ.अभिषेक धायगुडे, अंबाजोगाई वन विभागाचे वैजनाथ दौंड, माझे प्राचार्य  डी.डी. वाघमारे सर, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे, विजय वाघमारे, डॉ. अलका गीते,राहुल कांदे मनोज गावडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आव्हान यशदायिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किशोर पवार, उपाध्यक्षा पल्लवीताई भोईटे, सचिव विश्वजीत मुंडे यांनी केले आहे. 91 58 36 32 77 अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा