Subscribe Us

header ads

ओळ दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई आणी पीकविमा द्या -अशोक हिंगे

बीड स्पीड न्यूज 

ओळ दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई आणी पीकविमा द्या -अशोक हिंगे

बीड(प्रतिनिधी) दि.16 चालु वर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने कापुस सोयाबीन उडीद  मुग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. पिकही चांगली आली. परंतु ऑगस्ट महीन्यात पावसा न पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.मंध्यतरी सोयाबीन वर रोगांचा प्रादुर्भाव झाला.पिकांची आणेवारी कमी दिसत असतानाही आग्रमी पिकविमा देण्यास  कंपनी ने नकार दिला. आतातर संपूर्ण बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीन कापुस‌ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेताना तळ्याच स्वरूप आलं आहे.कापसाच पिक पुर्णपणे झडुन गेलं आहे. यापुर्वीही शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाई चां एक रूपया ही बीड जिल्ह्यात आला नाही. तेव्हा सरकारने पंचनाम्याची नाटक न करता बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन पिकवीमा कंपन्यांना पिकवीमा देण्याबाबत निर्देशीत करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी शासनाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा