Subscribe Us

header ads

बार्टीच्या मोफत स्पर्धा क्लासेसचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 


बार्टीच्या मोफत स्पर्धा क्लासेसचा शुभारंभ

बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची उपस्थिती : राहूल वाघमारे



बीड /  प्रतिनिधी-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात आले होते. या मोफत बॅचचा शुभारंभ  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे मंगळवार दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. अशी माहिती सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी दिली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त तथा स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख बार्टी पुणेचे उमेश सोनवणे, क्लाइंट पार्टनर, नॉर्थ अमेरिका प्रमुख, बँक ऑफ अमेरिकाचे सचिन सावंत, मनोरमा शिवलाल वाघ, सुशील भुजाडे, शिवाजीराव गवई, भारत शिंदे, चंद्रकांत शिंदे, डॉ. जयपाल इंगोले, प्रा. संजय जामठीकर, अनुपमाताई भुजाडे, वाल्मीक सुरवाडे, रवींद्र भगत, प्रमोद धुरंधर, प्रा. चंदू शिरसाठ, प्रा. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बॅच शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव राहुल वाघमारे, केंद्रप्रमुख अविनाश वडमारे, अंबिका शिंदे, प्रा.निलेश मुंदडा प्रा. प्रतीक्षा हिवरकर, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. भरत खेत्रे, प्रा. डॉ. श्रीधर आघाव,  प्रा. डॉ. बाळासाहेब जावळे, प्रा. सुरज जावळे, प्रा. दीपक सोनवणे, प्रा. दिवाकर तुपारे, प्रा.अर्चना आठवले,  प्रा. कोमल जगताप, सचिन काकडे, अनिल डोंगरे,  प्रा. शिवाजी रुपनर, प्रा. देवेंद्र कांबळे, विनोद जोगदंड, दिलीप गायकवाड, मुकेश निशिगंध, राहुल शिंदे, दीपक वाघमारे, गजानन खेत्रे , दिपालीताई निर्मळ, भारत पिव्हाळ संध्याताई तायड यांनी केलं आहे.
     

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा