Subscribe Us

header ads

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन ची बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे युनियन बांधणीसंदर्भात प्राथमिक बैठक, कोव्हिड योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला

बीड स्पीड न्यूज 


महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन ची बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे युनियन बांधणीसंदर्भात प्राथमिक बैठक,  कोव्हिड योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला

प्रतिनिधी (परळी वैजनाथ जि.बीड) दि.11. मंगळवार रोजी सोमेश्वर नगर येथे प्राथमिक बैठकीला मोठ्या संख्येने खाजगी नर्सेस व कंञाटी ,खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील खाजगी नर्सेस व खाजगी आरोग्य कर्मचारी यांची परिस्थिती अधिक बिकट आहे येथे अनेक वर्षांपासून खाजगी हाॅस्पिटल मध्ये आरोग्य सेवा बजावणाऱ्या कर्मचारी यांना अद्याप किमान वेतन ,फंड ग्रॅज्युएटी,विमा,संरक्षण,  व इतर सुविधा मिळत नाहीत अशी स्थिती आहे तरी या बाबत युनियन ची तालूका व जिल्हा समिती करुन युनियन च्या वतीने या सुख सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी जिल्ह्यातील खाजगी ,कंञाटी नर्सेस नी एकत्र येवून संघटना मजबूत करणे गरजेचे आहे यासाठी विभागीय व राज्य कमिटी नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही अध्यक्ष सतिश सर्वगोडे यांनी सोमेश्वर नगर हनुमान मंदिर येथे या कार्यक्रमा दरम्यान दिली तसेच मान्यवरांकडून सर्व खाजगी नर्सिंग स्टाफ व संबधित खाजगी आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग,आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका ,समाजसेवक यांना कोव्हिड योद्धा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य संघटक कार्याध्यक्ष अनिल जायभाये बीडकर व इतर पदाधिकारी यांनी केले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सतिश सर्वगोडे होते तसेच राज्य संचालक अभिजित हुपरीकर, काॅ. उपाडे ,गौतम साळवे सर , समाजसेवक गोपीनाथ कांगणे सर, अधिपरिचारिका मुक्ता नेमाडे मॅडम, आशा काळे मॅडम ,अंकुश माचेवाड सर, स्वपना जोंधळे मॅडम, नंदा जमदाडे मॅडम ,कालिदा कसबे मॅडम, कंडुकटले दादा,बाळसकर काका,गुट्टे मामा,प्रा.चंद्रकांत कराड सर , वसंत गिते साहेब, समाजसेवक शिवशंकर कराड साहेब , सुरेश भाऊ गिते, माऊली कराड साहेब, आनिल आवचार साहेब, रमेश ताल्डे सर,शशीकांत कराळे सर,ऋषिकेश घायाळ सर,सुनील फड सर , नेहरकर मॅडम, विजय जोगदंड सर,शाम बनसोडे सर,प्रतिभा हानवते मॅडम,छाया हानवते मॅडम, धनराज मुंडे सर, राहूल गुरव सर तसेच परळी वैजनाथ येथील खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग,रूग्ण हक्क परिषदेचे सदस्य व सोमेश्वर नगर मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर लगेचच सर्वांनीच भोजनाचा आस्वाद घेतला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा