Subscribe Us

header ads

शेतक-यांनी पीक कर्जाची परतफेड 31 जुलै पुर्वी करुन डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी

 बीड,दि.27 (जि.मा.का.):-शेतक-यांनी मागच्या वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड दि. 31 जुलै 2021 पूर्वी करुन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

            जिल्हा मध्सवर्ती बँक,व्यापारी बँकामार्फत शेतक-यांना  पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो.राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उध्दभवलेल्या कोविड- 19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतक-यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्याकडून शेतक-यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता दि. 1 जुलै 2021 रोजीचे शासन निर्णयाव्दारे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँकानी शेतक-यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दि. 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी  डॉ. पंजाबराव व्याज सवलत योजनेचा लाभ मिळवण्यास पात्र असतील.

            सर्व पात्र शेतक-यांनी त्यांच्या गत वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड दि. 31 जुलै 2021 पर्यंत संबंधित बँक शाखेमध्ये करावी अन्यथा  31 जुलै 2021 नंतर त्यांचे पीक कर्ज खाते थकबाकीमध्ये गेल्यास अशा कर्ज खात्यावर 9 ते 12 टक्के एवढया जादा दराची व्याज दराची आकारणी होणार आहे. सर्व पात्र शेतक-यांनी त्यांच्या गत वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड 31 जुलै 2021 पर्यंत संबंधित बँक शाखेमध्ये करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा