Subscribe Us

header ads

सुविधा घेतलेल्या नसतांना बदनापूर येथील महाविद्यालयात रेगुलर शिक्षण शुल्क का आकारले जात आहे

 सुविधा घेतलेल्या नसतांना बदनापूर येथील महाविद्यालयात रेगुलर शिक्षण शुल्क का आकारले जात आहे ? - सय्यद साज़ीद 




बदनापुर/हाफीज हारुन पठाण प्रतिनिधी- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षा पासुन आज पयर्ंत सर्व महाविद्यालये बंद होती. या काळात विद्यार्थ्यांनी लॅबररी, जिम, ट्युशन, कँटींन, गार्डन, गैदरींन इत्यांदी सुविधा घेतलेल्या नसतांना बदनापूर येथील महाविद्यालयात रेगुलर शिक्षण शुल्क का आकारले जात आहे? असा प्रश्न उपस्थित करुन कोरोना काळात महाविद्यालयातील बहुतेक सुविधांचा लाभ घेतलेला नसल्याने महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाणे सर्व सुविधांचे शुल्क लावून रेगुलरचे शिक्षण शुल्क आकारु नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक शहर कार्याध्यक्ष सय्यद साज़ीद यांनी केली आहे. 

यासंदर्भात सय्यद साज़ीद यांनी पुढे सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गतवर्षी ते आजपर्यत, महाविद्यालये बंद होती. फक्त ऑनलाईन अभ्याक्रम चालु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. असे असतानाही बदनापूर येथील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ट्यूशन शुल्क, स्वत:ची मेडिकल फीस, प्रो लाइब्रेरी फीस ,जिमखाना पत्रिका शुल्क, प्रो गैदरिंग फीस, विश्वविद्यालय ई सुविधा, छात्र कल्याण शुल्क, छात्र सहायता शुल्क,एन.एस.एसआवाहन आणि अविष्कार इन्द्रधनुष शुल्क, कॉलेज विकास शुल्क, यूनिफ़ॉर्म शुल्क शैक्षणिक किट, हे शुल्क आकारुन फी घेतली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या महाविद्यालयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला असुन, कोरोना आपत्तीमुळे विद्यार्थी आर्थीक संकटात सापडले आहे. असे असतानाही विद्यार्थ्याकडून पूर्ण फीसची सक्तीने वसूली महाविद्यालय करत आहे. विद्यार्थ्यांकडून बदनापूर येथील महाविद्यालया विविध शुल्कच्या नावाखाली नेहमीप्रमाणे भरमसाठा शिक्षण शुल्क आकारले जात असुन, फीस न भरणार्यांचे परीक्षा फॉर्म भरले जात नसल्याचा आरोपही, त्यांनी यावेळी केला आहे. विद्यार्थ्यांना नियमा प्रमाणे फिस आकारण्यासाठी कुलगुरूंनी याकडे स्वतः लक्ष देवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा मागणी, राष्ट्रवादी युवक शहर कार्याध्यक्ष सय्यद साज़ीद यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा