Subscribe Us

header ads

अनिल देशमुख यांना ‘ई.डी.’चे चौथ्यांदा समन्स. चौकशीस हजर राहण्याचे निर्देश


मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ई.डी.) चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. 
त्यांना सोमवार, २ ऑगस्टला हजर राहण्यास ‘ई.डी.’ने सांगितले आहे. 
तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश याच्यावरही ‘ई.डी.’ने समन्स बजावले असून त्यालाही सोमवारी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 
अनिल देशमुख यांना यापूर्वी तीन वेळा ‘ई.डी.’ने समन्स बजावला होता. 
मात्र देशमुख यांनी चौकशीस जाणे टाळले होते. 
तसेच त्यांची पत्नी आणि मुलालाही ‘ई.डी.’ने समन्स बजावला होता. 
मात्र तेही चौकशीला हजर झाले नव्हते.
 देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला बार मालकांकडून दरमहिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. 
याप्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अनिल देशमुख यांची आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू आहे. 
‘ई.डी.’ने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. 
देशमुख कुटुंबीयांनी दिल्लीस्थित बनावट कंपनीच्या माध्यमातून चार कोटी १८ लाख रुपयांची रक्कम श्री साई शिक्षण संस्थेत वळविल्याचा दावा ई.डी.ने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा