Subscribe Us

header ads

अल्पवयीन मुलीवर अत्याचार!




बीड-:  लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने 16  वर्षीय मुलीला  पळवून नेत  सातत्याने त्याच्यावर अत्याचार केला आहे. यानंतर  तीचा गर्भपात केला. तसेच पीडित मुलीच्या आईला आमचे लग्न लावून द्या असं म्हणत पीडित मुलीच्या आईचाही विनयभंग केला. हे घटना ठाकर आडगाव येथे घडली. याप्रकरणी तलवाडा पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आरोपी आकाश सोनवणे हा फरार आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की ठाकर आडगाव येथे 35 वर्षीय ऊस तोड कामगार महिला व दोन मुले एका 16  वर्षीय मुलीसह राहते. आकाश सोनवणे या तरुणाने वर्षभरापूर्वी लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीला पळवून नेत त्याच्यावर सातत्याने अत्याचार केला.  दरम्यान गर्भवती राहिल्याने मुलीचा गर्भपात केला. यानंतर गावी येत आमचे लग्न लावून द्या असे म्हणत आकाशने पीडित मुलीच्या आईचाही  दोन वेळेस विनयभंग केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेने तलवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. तलवाडा पोलिसांनी आकाश सोनवणे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार,  विनयभंग या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक अर्चना भोसले हे करीत  असून आरोपी फरार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा