Subscribe Us

header ads

आ. संदीप क्षीरसागरांकडून अशोक ढोले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव अशोकच्या कार्याचा बीड वासीयांना अभिमान

बीड (प्रतिनिधी):-  गेली अनेक वर्षांपासून वंचित घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकदादा ढोले अविरतपणे  सामाजिक कार्य करत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी जाणून घेत प्रशासकीय स्तरावर प्रयन्तशील राहून त्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी निस्वार्थ सेवा देत आहे. त्यांच्या याच कार्याची विशेष दखल बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली. आ. संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी दिनांक ३१ जुले २०२१ रोजी आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
 
समाजापयोगी उपक्रम राबवणे , वृक्षरोपण करणे याचबरोबर जनहितार्थ  शिबारांचे आयोजन करण्यासाठी स्वतः हुन परिश्रम घेतात. कोरोनासारख्या महामारीत नागरिकांमध्ये जनजागृती कारण्यापासून ते मास्क, सॅनिटायझर अश्या आरोग्य साहित्याचे वाटप केले.  कोरोना रोगाच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मनातून शंका दूर करून लसीकरण करण्यास प्रोसाहित करण्याचे मोलाचे कार्य केले. कोविड रुग्णांना देणगीदारांच्या मदतीने बेडची व्यवस्था केली. याचबरोबर शेतकऱयांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलने करत शेतकऱयांची बी-बियाणात फसवणूक झाल्यास बातमीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्याचे कार्य केले आहे. पीकविमा भरण्यास शेतकरी राजाला साहाय्य करणे, दिव्यांग तसेच अनाथ बालकांना योजने संदर्भातील लागणारी कागदपत्रे मिळवून देण्यास विशेष मोहीम राबवण्याचे काम अशोक ढोले यांनी सदैव केले. बीड जिल्हा रुग्णालयात रक्त साठ्याचा तुटवडा निर्माण झाल्यास तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसाठा वाढवण्याचे काम त्यानी केलं आहे. समाज कार्याचा ध्यास असणारे अशोकदादा ढोले पाटील यांनी नागरिकांच्या पाणी, रस्ते, वीज या बाबतच्या समस्या नगर परिषद प्रशासनासमोर मांडून त्या सोडऊन घेतल्या आहेत. जेष्ठ व्यक्तीपासून ते तरुण मित्रपरिवारापर्यंत मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वपरिचित आहेत. त्यांच्या याच कार्याची विशेष दखल बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली. आ. संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी दिनांक ३१ जुले २०२१ रोजी आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आमदारसाहेब पुढे बोलताना म्हनाले कि, अशोक ढोले यांच्या सामाजिक कार्याचा अभिमान बीडवासीयांना आहे. पुढेही समाजकार्याचा वसा अविरतपणे चालू ठेऊन असेच समाजोपयोगी कार्य हातून होत राहो अश्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा