Subscribe Us

header ads

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा अखेर राजीनामा

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटकतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यांनी राजीनामा देण्याआधी ३५ मिनिटे भाषण केले. यादरम्यान त्यांच्या डोळ्यांत बऱ्याचदा अश्रू आले. आपण भाजपला राज्यात मोठं करण्यासाठी काय काय केलं. याबाबत भावना व्यक्त केल्या.

कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच तसे झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. २५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा, असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी केलं होतं.

नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी यांचं सरकार २३ जुलै २०१९ रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त ९९ मतं तर विरोधात १०५ मतं पडली होती. येडियुरप्पा यांनी २६ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसंच उत्तर कर्नाटकचे खासदार देखील आहेत. जोशी यांच्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचाही जोर आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे कुशल प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटकतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यांनी राजीनामा देण्याआधी ३५ मिनिटे भाषण केले. यादरम्यान त्यांच्या डोळ्यांत बऱ्याचदा अश्रू आले. आपण भाजपला राज्यात मोठं करण्यासाठी काय काय केलं. याबाबत भावना व्यक्त केल्या.

कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच तसे झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. २५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा, असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी केलं होतं.

नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी यांचं सरकार २३ जुलै २०१९ रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त ९९ मतं तर विरोधात १०५ मतं पडली होती. येडियुरप्पा यांनी २६ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसंच उत्तर कर्नाटकचे खासदार देखील आहेत. जोशी यांच्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचाही जोर आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे कुशल प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा