Subscribe Us

header ads

तहसीलदार खाडे यांची वाळू माफिया वर दबंग कारवाई पाच कोटींचा मुद्देमाल जप्त


गेवराई-: गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा सुरुच होता हायवाद्वारे वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही काही वाळू माफिया रात्री अपरात्री वाळुची वाहतूक करत होते. दरम्यान राक्षसभुवन शिवारातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना मिळाल्यावर, त्यांनी
दि.19 रोजी पहाटे महसूल विभागाने छापा मारून वाळुने भरलेले 17 हायवा पकडले. या कारवाईमुळे वाळू माफियात खळबळ उडाली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळुचा उपसा सुरुच आहे. वाळु माफियांविरोधात कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे वाळुचा उपसा होत आहे. राक्षसभुवन शिवारातून रात्रीच्या दरम्यान वाळुचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना झाल्यानंतर त्यांनी आज पहाटे घटनास्थळी छापा टाकला. या वेळी 17 हायवा घटनास्थळी  मिळून आले. तहसीलदारांनी छापा टाकल्यानंतर नदीपात्रात वाळू माफियांची एकच खळबळ उडाली. काही हायवा चालकांनी गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र या कारवाईत एकूण 17 गाड्या महसूल विभागाला सापडल्या. यात काही ब्रास वाळुही होती. अंदाजे एकूण 5 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार सचीन खाडे, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे, युवराज टाकसाळ, मंडळ अकिारी पखाले, लेंडाळ, अंगद काशीद, कुरळकर, कुलकर्णी मॅडम, शेख जावेद, तलाठी पांढरे, डोपे, देशमुख, सुरावार, सुपेकर, ढाकणे, कोतवाल काळे, बेलुर, गिरी, चव्हाण यांनी केली. दरम्यान या सर्व हायवा गेवराई बस डेपोच्या आवारात लावण्यात आल्या असून पुढील कारवाई सुरू होती. यातील काही गाड्या दुसऱ्या जिल्ह्याचे तर काही गाड्या बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. या कारवाईमुळे वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा