Subscribe Us

header ads

नागरीकांनी बकरी ईद सण शांततेत पार पाडावा-जिल्हाधिकारी

कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त

बीड,दि.19 (जि.मा.का.):-  बकरी ईद सण  दिनांक 21 जुलै 2021 रोजी साजरा करण्यात येत आहे. सर्व मुस्लीम बाधवांनी बकरी ईद सण शांततेत पार पाडावा व कायदयाचे कोठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन श्री तुषार ठोंबरे,जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.

            दिनांक 20 जुलै 2021 ते 22 जुलै  2021 रोजी बकरी ईद सणामुळे जनावरांची कत्तल, कुर्बाणी करण्यात येत असते.  कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी पशुसंवर्धन खात्यातील पशुधन विकास अधिकारी सक्षम अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

             शासन परिपत्रक दिनांक 7 जुलै 2021 अन्वये कोविड-19 मुळे उदभलेल्या संसर्गजन्य परिस्थतीचा विचार करता यावर्षी बकरीईद साध्या पदधतीने साजरी करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे. शक्यतो असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बाणी करावी व बकरी ईद च्या निमीत्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या कायम करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमीत्त कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.कोविड 19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन व आरोग्य पर्यावरण वैदयकिय शिक्षण विभाग तसेच सबंधित नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमाचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल. तसेच या परिपत्रका नंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही नविन सूचना आल्यास प्रसिद्धी देण्यात येईल.

       सदर सणानिमित्त  महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995, दिनांक 4 मार्च 2015 पासुन राज्यात लागु ची अंमलबजावणी करण्याकरीता या कायदयातील तरतुदीप्रमाणे

1. गाय किंवा वळु किंवा बैलाची कत्तल करण्यास सक्त मनाई आहे.

2. कत्तल करण्यासाठी गाय,वळु किंवा बैल यांची वाहतुक करण्यात प्रतिबंध आहे.

3. कत्तल करण्यासाठी गाय,वळु किंवा बैल यांची निर्यात करण्यास प्रतिबंध आहे.

4. गाय वळु किंवा बैल यांची अन्य कोणत्याही पदधतीने विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  गाय, वळु,बैल यांचे     मांस बाळगता येणार नाही.

5. अनुत्पादक म्हशी आणि म्हशीची पारडे या प्राण्यांची सक्षम पशुवैदयका मार्फत कत्तलपूर्व तपासणी न करता कत्तल करण्यास मनाई आहे.

6. वाहतुक अधिनियम 1978 मधील नियम 47 अन्वये वाहतुक होणा-या जनावराचे वाहतुकी पूर्वी नजिकच्या पशुधन    विकास अधिकारी पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी-1 यांचेकडून स्वास्थ तपासणी प्रमाणपत्र घेण्यात यावे.

7. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैदयकिय सर्वचिकीत्सालय, जिल्हा पशुवैदयकिय सर्वचिकीत्सालय यांचे वाहतुक प्रमाणपत्र घेण्यात यावे.

8.  स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचे नियोजीत तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी जागा पशुसंवर्धन विभागास दाखवावी. तात्पुरते  कत्तलखाना मंजुरी नंतर पशुधन विकास अधिकारी सक्षम अधिकारी नियुक्ती केल्यानंतर सक्षम अधिका-याकडुन कत्तलीस योग्य जनावरांचे स्वास्थ प्रमाणपत्र घेतल्यानंतरच कत्तलीस परवानगी देण्यात येईल.

      कत्तलप्राप्त जनावरांचे कत्तल घरी करण्यास सक्त मनाई आहे.मान्यताप्राप्त कत्तल खाण्याच्या ठिकाणी किंवा तात्पुरत्या कत्तलखान्याच्या ठिकाणीच कत्तलीस परवानणी देण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा