Subscribe Us

header ads

सुर्डी बलात्कार प्रकरणी पोलिसानी आरोपीला फाशी होण्यासाठी प्रयत्न करावे प्रा. इलियास इनामदार

प्रतिनिधि: माज़लगांव तालुक्यातील सुर्डी येथे नौ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास कठोर कार्यवाही करण्यात यावी व पोलिसान्नी आरोपीला फाशी होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी लोकसेना संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब, सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांना बीड जिल्हाधिकारी मार्फ़त केली आहे.  ग्रामीण पोलिस स्टेशन माजलगांव येथे दि. 13/07/ 2021 रोजी FIR क्रमांक 0176/2021 मध्ये आरोपी पुरुषोत्तम श्रीराम घाटुळ रा. सुरडी नजीक ता. माजलगांव जि. बीड च्या विरोधात भादवी कलम 376 (M) व बालकाचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनीयम 2012 चे कलम 4,5 (M), 6, 10, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे की पीडीत अल्पवयीन मुलगी ही वय 9 वर्षाची असुन, नराधम आरोपीच्या अत्याचारामुळे गंभीर दुखापत झाली व अती रक्त स्त्रावामुळे शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आली होती तीची  परिस्थीती गंभीर आहे. तरी सुध्दा सदरहु गुन्ह्यातील आरोपीला मा. न्यायालया समक्ष हजर करून पी.सी. आर. मागुन सखोल चौकशी करण्याची गरज असतांना तपास अधिकारी यांनी पी. सी. आर.ची मागणीच केली नाही व सरळ सरळ आरोपीला जामीनासाठी मोकळा रस्ता करुन दिला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनची भूमिका संषयास्पद असल्याचे दिसुन येते. म्हणुन  आम्ही या निवेदणाद्वारे अशी मागणी करत आहोत की, 1) सदरहु प्रकरणातील तपास अधिकारी याची सखोल चौकशी करुन योग्यती कार्यवाही करुन दंडीत व निलंबीत करण्यात यावे. 2) आरोपीस कायम निकाल लागेपर्यंत मा. न्यायालयाच्या कोठडीत ठेवून जलद गती कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी. 3) सदर प्रकरणाचा तपास इतर योग्य त्या सक्षम अधिकाऱ्याला देवून प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा.
आरोपी हा पीडीताच्या विरुध जातीचा असल्यामुळे व पीडीता ही अल्पसंख्याक समाजातुन असल्यामुळे आरोपी जर जामीनावर सुटुन आल्यास तपास कामात अडथडा निर्माण करु शकतो व गावात व परीसरात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे करीता पालकमंत्री यांनी गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवून या प्रकरणाची तात्काळ दखल घेवुन पीडीतेस न्याय द्यावा.
     नसता शासन व जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोक आंदोलन उभे केले जाईल याची नोंद शासनाने घ्यावी. निवेदनावर लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार, मानवधिकार सुरक्षा परिषदचे शेख सरफ़राज़ मेंबर, कामगार सेनाचे  सय्यद फरहान, अल्पसंख्याक शिवसंग्रामचे शेख जाकेर, उलेमा कॉन्सिलचे मौलाना ज़फर काज़ी, शिवसेनेचे मिर्ज़ा समीर पटेल, समाजसेवक मोहसिन शेख, बेग खैसर मामू, जाकेर पठान, साबीर शेख, जाकिर पठान मोहम्मद टेलर इत्यादिँचे सह्या आहे.
      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा