Subscribe Us

header ads

वाढदिवसाचं बेकायदा होर्डिंग लावल्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापले

पुणे-: वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नये, 
असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला असला तरी तो धुडकावत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावले आहेत.
 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. 
बॅनर, जाहिराती केल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे भा.ज.पा.कडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 
तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधी करोना नियंत्रणासाठी द्यावा, 
असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
मात्र तरीही शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. 
यावर माध्यमांनी प्रश्न विचारले असता अजित पवार भडकले. 
अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो.
 त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत.
 आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, 
भा.ज.पा.कडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले; 
या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. 
या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे. 
त्यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच भडकले. 
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांनीही होर्डिग लावले असल्याचे पत्रकारांकडून विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले,” गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? 
आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा