Subscribe Us

header ads

ए.टी.एम.(A.T.M.) फोडण्यासाठी चोरट्यांनी घडवला भीषण स्फोट मध्यरात्री संपूर्ण परिसर हादरला

पिंपरी-: चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे ए.टी.एम. फोडण्यासाठी स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली असून बॉम्ब निकामी करणारं बी.डी.डी.एस.चे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. 
ही घटना मध्यरात्री चाकणमध्ये ही घटना घडली असून स्फोटामुळे परिसर हादरला असल्याचं समोर येत आहे. 
ए.टी.एम.जवळ स्फोट घडवून आणल्यानंतर अज्ञातांनी पैसे घेऊन पोबारा केला आहे. 
काही विशिष्ट स्फोटके वापरून हा स्फोट घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
चाकणच्या भांबोली येथे अज्ञात चोरट्यांनी हा स्फोट करून ए.टी.एम. फोडलं आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत,
अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
दरम्यान, स्फोट अत्यंत भीषण स्वरुपाचा होता.
 यात ए.टी.एम.चे शटर तुटले असून परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरला आहे. 
स्फोटाचा आवाज ऐकताच ए.टी.एम. असणाऱ्या इमारतीमध्येच मागील बाजूस राहणार इमारतीचा मालक तिथे आला. 
पण अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावून परत घरी जाण्यास सांगितले. 
मालक देखील घाबरून घरी परत गेला. 
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून बी.डी.डी.एस.ला देखील पाचारण करण्यात आले. 
ए.टी.एम. फोडण्यासाठी स्फोट घडवल्याची पहिल्यांदाच घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पिंपरी-: चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे ए.टी.एम. फोडण्यासाठी स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली असून बॉम्ब निकामी करणारं बी.डी.डी.एस.चे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. 
ही घटना मध्यरात्री चाकणमध्ये ही घटना घडली असून स्फोटामुळे परिसर हादरला असल्याचं समोर येत आहे. 
ए.टी.एम.जवळ स्फोट घडवून आणल्यानंतर अज्ञातांनी पैसे घेऊन पोबारा केला आहे. 
काही विशिष्ट स्फोटके वापरून हा स्फोट घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
चाकणच्या भांबोली येथे अज्ञात चोरट्यांनी हा स्फोट करून ए.टी.एम. फोडलं आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत,
अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
दरम्यान, स्फोट अत्यंत भीषण स्वरुपाचा होता.
 यात ए.टी.एम.चे शटर तुटले असून परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरला आहे. 
स्फोटाचा आवाज ऐकताच ए.टी.एम. असणाऱ्या इमारतीमध्येच मागील बाजूस राहणार इमारतीचा मालक तिथे आला. 
पण अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावून परत घरी जाण्यास सांगितले. 
मालक देखील घाबरून घरी परत गेला. 
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून बी.डी.डी.एस.ला देखील पाचारण करण्यात आले. 
ए.टी.एम. फोडण्यासाठी स्फोट घडवल्याची पहिल्यांदाच घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा