Subscribe Us

header ads

खाजगी रुग्णालयाने कोरोना बाधित रुग्णांकडून तब्बल साडे चौदा लाख जास्त पैसे घेतल्याचे उघड पैसे परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड-: कोरोना काळात बीड जिल्ह्यातील 79 खाजगी रुग्णालयांना कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्याची परवानगी जिल्हा आरोग्य विभागाने दिली होती. या रुग्णालयांमध्ये 7 हजार 17 रुग्णांकडून तब्बल साडेचौदा लाखांची जादा रक्कम लुटल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. ही रक्कम संबंधित रुग्णांना तात्काळ परत करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी बुधवारी रुग्णालयांना दिले आहे.
आदेशात पुढे म्हटले आहे की कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची परवानगी देतानाच खाजगी रुग्णालयांना शासनाकडून उपचाराचे दर निश्चित करून दिले होते. तरीही काही रुग्णालयांनी जादा रक्कमा आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने लेखापरीक्षणाचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात प्रशासनाने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास मान्यता दिलेल्या एकूण 79 खाजगी रुग्णालयांतील देयकांची तपासणी करण्यासाठी 129 अधिकाऱ्यांची एकूण 17 भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. या पथकांनी 20 जून 2021 पर्यंत खाजगी रुग्णालयांत उपचार घेतलेल्या एकूण 7306 रुग्णांच्या देयकांपैकी 7017 देयकांचे लेखापरिक्षण केलेले आहे. लेखापरिक्षण प्रक्रियेत जिल्ह्यातील रुग्णालयांनी रुग्णांना त्यांच्या देयकांमध्ये एकूण 1 कोटी 95 लाख 70 हजार 454 रुपये इतकी सूट दिल्याचे आढळून आले आहे. तथापी रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा 14 लाख 39 हजार 289 रुपये इतकी जादा आकारणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर जादा आकारणीच्या रक्कमा संबंधित रुग्णांना तात्काळ परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत. दरम्यान या आदेशामुळे खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा