Subscribe Us

header ads

अजित दादांच्या वाढदिवसा निमित्त संकल्प निरोगी बीड अभियानाचा आ. संदीप क्षीरसागराच्या उपस्थितीत शुभारंभ

नॉन कोव्हिड रुग्णांची आरोग्य तपासणी; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळेंच्या नियोजनात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपक्रम

बीड (प्रतिनिधी):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या संकल्पनेतुन आणि सामाजिक न्याय व विशेष सहायय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात आज ‘संकल्प निरोगी बीड’ अभियानाची सुरुवात बीडचे आ. संदिप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या नियोजनातुन होत असलेल्या या अभियानाला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा रूग्णालयापासुन प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या, शिबीर घेण्यात आले.

बीड येथील जिल्हा रूग्णालयात आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, सुनिल धांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत संकल्प निरोगी बीड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आज जन्मलेल्या बालकांचा जन्मोत्सव साजरा करत त्यांना साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा रूग्णालयात नॉन कोवीड रूग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, गरोदर माता तपासणी, सोनोग्राफी आदी तपासण्या करण्यात आल्या. या अभियानातंर्गत पत्रकारांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली.

*शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी*

अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प निरोगी बीड अभियानाचा आ.संदिप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे.

*नागरिकांनी संकल्प निरोगी अभियानाचा*
*लाभ घ्यावा-आ.संदिप क्षीरसागर*

अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना हॉस्पिटलच्या वतीने अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी मोफत तपासणी शिबीर हाती घेतले आहे. संकल्प निरोगी बीड अभियानाच्या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, किडनी फँक्शन, लिव्हर फंक्शन टेस्ट, गरोदर माता तपासणी, सोनोग्राफी आदी तपासण्या करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवून अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा