Subscribe Us

header ads

वाळू माफियाची ग्रामस्थांना धमकी..! लोकेशन दिल्याच्या संशयावरुन दिली धमकी.


दिवसें दिवस वाळु माफियांचे प्रकरणे वाढतच आहेत, प्रशासनाने लक्ष घालावे, स्थानीक ग्रामस्थांतुन मागणी.





 गेवराई/टाकरवण दि.24 : टिप्पर पकडून दिल्यामुळे वाळू माफियाने ‘सतत माझ्या टिप्परच्या लोकेशनवर का असतात’ असे म्हणत वाळू माफियाने ग्रामस्थांना धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे जेसीबी ट्रॅक्टर, हायवाच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. असेच बीड जिल्ह्यातील वाळु उपस्याचे प्रकार वाढलेले समोर येतच आहेत.  या वाळू वाहतुकीच्या वाहनामुळे लगतच्या दत्तबाग वस्तीवरील नागरीकांना मोठा त्रास होत आहे. शुक्रवारी पहाटे वाळूने भरलेला हायवा दत्तबाग येथे पकडला. यावेळी वाळूमाफिया रामेश्वर चिंतामणी कांबळे (रा.चिंचवडगाव) याने ग्रामस्थांना ‘माझा टिप्पर पकडलेला तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तुकाराम चोपडे, बालासाहेब शिंदे, परसराम शिंदे, शरद शिंदे, रमेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा