Subscribe Us

header ads

तेलगाव येथे धाडसी घरफोडी तब्बल साडे तीन लाखाचा ऐवज लंपास



दिंद्रुड-: तेलगाव येथील श्रीकृष्ण पार्क  येथे लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घरात प्रवेश करत महिला व पुरुष यांना मारहाण करत रोख रक्कम आणि दागिने असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे. या चोरीच्या घटनामुळे तेलगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण पार्क येथे एका रोहाऊस मध्ये गुरुवारी मध्यरात्री  चोरट्यानी प्रवेश करीत लक्ष्मण भानुदास शिंदे व त्यांचे घरातील सदस्यांना मारहाण करीत महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. व रोख 2 लाख 40 हजार रुपये असा  साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.या मारहाणीत जखमी महिलाला तेलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर.  उपविभागीय पोलिस अधीक्षक सुरेश पाटील. स्थानिक गुन्हे शाखा भरत  राऊत आणि दिंद्रुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा