Subscribe Us

header ads

दारूच्या नशेत मुलाने केला बापाचा खून.

 शिरूर-:  दारू पिऊन घरी आल्याबद्दल जाब विचारल्याने रागाच्या भरात मुलाने बापावर चाकू हल्ला केला.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील लिंबा येथे ही घटना घडली.नशेच्या भरात असलेल्या स्वामी नागरगोजे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश बाबासाहेब नागरगोजे (वय 50, रा. लिंबा . ता. शिरूर) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.  गणेश नागरगोजे यांचा मुलगा स्वामी नागरगोजे यास दारू पिण्याचा व्यसन होता. मंगळवार 13 जुलै रोजी दुपारच्या सुमारास स्वामी नागरगोजे दारू पिऊन घरी आला. त्यामुळे गणेश नागरगोजे यांनी त्याला दारू पिऊन घरी का आलास असा जाब विचारला वडिलांनी जाब विचारल्याने संतापलेल्या स्वामी यांनी हल्ला चढविला चाकूने सपासप वार केले.  या हल्ल्यात गणेश नागरगोजे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि 20 जुलै  दुपारी 1:30) त्यांचा मृत्यू झाला असे पोलीस हवालदार हरी जाधव याने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत. नमूद केले आहे.सदर फिर्यादीवरून स्वामी याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक