Subscribe Us

header ads

बीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न

बीड (प्रतिनिधी):-  बीड अस्थिरोग तज्ञ संघटनेच्या वतीने महाराष्ट्र अस्थिरोग तज्ञ संघटने अंतर्गत राज्यस्तरीय वेबिनार नुकतेच घेण्यात आले. या वेबिनारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती या वेबिनारचे संयोजक अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद शिंदे यांनी दिली.
या राज्यस्तरीय वेबिनारमध्ये भारतीय अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी शिवशंकर, महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.अजित शिंदे (सांगली), राज्य सचिव डॉ.एन जे करणे (पुणे), डॉ. गाडेगोने (चंद्रपूर), बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह तसेच राज्यातील अनेक अस्थिरोग तज्ञांनी सहभाग नोंदवला.
या वेबिनारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांनी अत्यंत बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये या मार्गदर्शनाचा अस्थिरोग तज्ञांना याचा निश्चित फायदा होणार आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल द्वारा या परिषदेला क्रेडिट पॉईंट देण्यात आले. राज्यभरातून अनेक अस्थिरोग तज्ञ या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. बीड मधील डॉ. विजय कट्टे व डॉ. गणेश देशमुख यांनी प्रेझेंटेशन केले. अशा प्रकारचे मार्गदर्शनपर वेबिनार प्रत्येक महिन्याला घेण्याचा मानस संघटनेचा असल्याचे वेबिनारचे संयोजक डॉ.प्रमोद शिंदे यांनी सांगितले. सदर वेबिनारच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल राज्य संघटनेकडून कौतुक करण्यात आले. शेवटी डॉक्टर एस.एल.आळणे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा