Subscribe Us

header ads

पुरामुळे नुकसान होवू नये यासाठी आता कठोर निर्णयांची गरज-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       भविष्यात नदीपात्रातीलब्ल्यू व रेड लाईनच्या बांधकामासंदर्भात कडक भूमिका

·       शहरातील नदीनालेओढ्यातील अतिक्रमणग्रस्त बांधकामे काढावीलागतील

·       महामार्गावर पाणी येणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे आवश्यक

·       रस्ते खचणेदरड कोसळणाऱ्या गावांचे मोठ्या प्रमाणावर पुर्नवसनकरावे लागेल

 

कोल्हापूर, दि. 30 : पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्यशासनाचा भर राहीलअसे सांगून भविष्यात पूरपरिस्थितीत नागरिकांचे नुकसान होवू नयेयासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतीलअसा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.

            कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, शिरोळशाहूपुरीपंचगंगा हॉस्पिटलशिवाजी पूल आदी ठिकाणच्या पूरबाधित भागाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाहणी केली. यानंतर पूर परिस्थितीबाबत सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झालीयावेळी ते बोलत होते.

            बैठकीसाठी ग्रामविकास मंत्री हसनमुश्रीफजिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटीलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,नियोजन मंडळाचे  कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधवजिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटीलखासदार सर्वश्री संजय मंडलिकधैर्यशील मानेआमदार सर्वश्री ऋतुराज पाटील,प्रकाश आवाडेचंद्रकांत जाधवराजेश पाटीलजयंत आसगावकरप्रकाश आबीटकर यांच्यासह माजी आमदार उल्हास पाटीलडॉ. सुजित मिणचेकरसत्यजित पाटीलमुख्य सचिव सीताराम कुंटेजिल्हाधिकारी राहुल रेखावारमहानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेमुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणजिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यात कोल्हापूरसांगलीसह अन्य काही जिल्ह्यांवर अतिवृष्टिमुळे पुराचे संकट ओढावले. नदीनालेओढ्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ही स्थिती उद्भवते आहे. रेड -ब्ल्यूलाईनमध्ये झालेल्या बांधकामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात अशा बांधकामांना परवानगी देवू नयेया भागात झालेली अतिक्रमणे काढावीतअशा सक्त सूचना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

            पुरामुळे झालेली हानी, 'मी पाहतो आहेयातून नक्कीच मार्ग काढण्यात येईल. स्थलांतर करून प्रशासनाने लाखो नागरिकांचे प्राण वाचविल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद. कोविडपूर व पुराच्या अनुषंगाने झालेले नुकसान व पुरामुळे रोगराई रोखण्याचे राज्यापुढील प्रमुख आव्हान असून राज्यसरकार याचा धैर्याने मुकाबला करेल. निसर्गतौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना आधार देण्याचं काम राज्यशासनाने केले आहे. पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेवून राज्य शासन पूरग्रस्तांना भरीव मदत करेलयासाठी केंद्राकडे ही आर्थिक मदत मागितली जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            जिल्ह्यातील पशुधन जगविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या चार साखर कारखान्यांच्या कामाचे कौतुक करुन उर्वरित साखर कारखान्यांनी या कामी पुढाकार घ्यावाअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर पुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उड्डाणपुलांचे नियोजन करावे लागेल. खरडून गेलेल्या शेतीचे व पिकांचे पंचनामे तात्काळ करावेतया कामी आवश्यक त्या ठिकाणी पंचनाम्यांसाठी ड्रोनचा वापर करावा. कोल्हापूर शहर सुधारणेच्या दृष्टीने महानगरपालिकेला आवश्यक निधी राज्यशासन देईलमात्र त्याचा विनियोग योग्य पध्दतीने व्हावाअशी सूचनात्यांनी केली. 

            ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेअतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने यावे. या भीषण पूरपरिस्थितीत केंद्राने राज्याला मदत करावी. आपत्तीत झालेल्या नुकसानीसाठी  केंद्राकडे ज्यादा मदत मागण्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पूरपरिस्थितीत मानवतेच्या भावनेतून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे श्री. मुश्रीफ यांनी आभार मानले.

             मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित शहर व ग्रामीण भागाची पाहणी करण्यासाठी वेळ दिलायाबद्दल तमाम कोल्हापूरकरांच्या वतीने आभार अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आभार मानले.

            तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तर महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांनी शहरातील नुकसानीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा