Subscribe Us

header ads

सचोटीने व्यवहार केल्यास खात्रीने यश मिळते हे किसनलाल मुनोत यांनी सिद्ध केले- विधिज्ञ कालिदास थिगळे.किसनलाल मुनोत यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान.


बीड-: किसनलाल मुनोत यांनी शून्यातून विश्व निर्माण करतांना सचोटीने व्यवहार केल्यास यश मिळते हे तर दाखवून दिलेच पण या जन्मी केलेल्या पुण्याईचे मापही याच जन्मी पदरी पडते हेही सिद्ध केले आहे असे गौरोवोद्गार प्रख्यात विधिज्ञ कालिदास थिगळे यांनी काढले. त्यांच्या हस्ते किसनलाल मुनोत यांना सद्भावना मंडळाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सद्भावना मंडळ आणि राव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात येथील मुनोत क्लॉथचे संस्थापक  जुन्या पिढीतील कपडा व्यावसायिक तथा जैन धर्म ग्रंथांचे अभ्यासक किसनलाल मुनोत यांना मानपत्र,शाल,श्रीफळ आणि पुष्पहाराने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी त्यांच्या पत्नी सौ.कुंवरबाई याही उपस्थित होत्या. यावेळी जेष्ठ विधिज्ञ कालिदास थिगळे यांनी मुनोत यांच्या कार्याचा गौरव केला.किसनलाल मुनोत यांनी व्यापारात प्रामाणिकपणे व्यवहार करून यश मिळवता येते हे दाखवून देत सचोटीला धार्मिक अधिष्ठान देऊन पुण्यकर्म देखील करता येते हे वैयक्तिक आचरणातुन दाखवून एक आदर्श निर्माण केल्याचे थिगळे म्हणाले.जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांनीही किसनलाल मुनोत यांच्या कार्यावर प्रकाश टाकला,ते म्हणाले किसनलाल मुनोत यांनी प्रदीर्घ संघर्ष आणि सचोटीपूर्ण व्यवहारातून ओळख निर्माण केली आहे. किराणा दुकानदार ते बीड शहरातील कपड्याचे प्रसिद्ध समृद्ध दालन उभे करणारे कष्टाळू जिद्दी व्यक्तिमत्त्व अशी त्यांच्या यशाची चढती कमान व्यावसायिकांना प्रेरणा देणारी आहे.त्यांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र  दिलीप मुनोत,राजेंद्र मुनोत, आणि संजय मुनोत हे समर्थपणे पुढे चालवत आहेत.त्यांचे समाजकार्यातील योगदान हे होतकरू तरुणांच्या जीवनाला स्थैर्य देणारे राहिले आहे. धार्मिक ग्रंथावरील त्यांचे लिखाण अभ्यासकांसाठी देखील मार्गदर्शक ठरत आहे.कार्यक्रमास वाय. जनार्दन राव,अभय कोटेचा, राधेश्याम मुंदडा,पुसाराम लद्दड,शांतीलाल पटेल, प्राचार्य रत्नाकर, क्षीरसागर, विलास बडगे,अमर डागा,राम मोटवाणी,सूरज लाहोटी , रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश मुळे, मुकुंद कदम हे उपस्थित होते.
यावेळी मानपत्र वाचन आणि सूत्रसंचालन विकास उमापूरकर यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत दिलीप मुनोत,राजेंद्र मुनोत,संजय मुनोत यांनी केले.कार्यक्रमास कोव्हीड नियमावली पाळून आमंत्रित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा