Subscribe Us

header ads

संस्कार, संस्कृती टिकवण्याची युवा पिढीवरच जबाबदारी : स्वरश्री भारत आण्णा लोळगे

१५ ते १८ तास काम करुन घेणाऱ्या शिरीराच्या संमृध्दीसाठी १ तास व्यायाम अवाश्यक : योगगुरु अॅड.श्रीराम लाखे

बीड प्रतिनिधी-:
गुरू पुजन घरातुन करता येणे गरजेचे आहे. अाई-वडील हे प्रत्येकाचे पहिले गुरु अाणि दैवत असतात. प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बळ हे गुरु यांच्या मार्फतच मिळते. राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलकडून गुरु पुजनाचा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे या एकविसाव्या शतकात, विज्ञान युगामध्येही भारत देशाचे संस्कार, संस्कृती टिकवण्याची खरी जबाबदारी ही युवा पिढीवरच अाहे, ती त्यांनी समर्थपणे स्विकारुन, अाचरणात अाणावी तसेच पुढच्या पिढीकडे समक्षपणे सुपूर्द करावी, असे प्रतिपादन स्वरश्री भारत आण्णा लोळगे यांनी व्यक्त केले. तसेच दैनंदीन २४ तासामध्ये १५ ते १८ तास काम करुन घेणाऱ्या शिरीराच्या चांगल्या अाराेग्यासह संमृध्दीसाठी दरराेज किमान १ तास व्यायाम अवाश्यक, असे मत सत्कारमुर्ती योगगुरु अॅड.श्रीराम लाखे यांनी व्यक्त केले.

राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलद्वारे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुरुवंदन पुरस्काराचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी स्वरश्री  भारत आण्णा लोळगे अाणि योगगुरु अॅड.श्रीराम लाखे यांना गुरुवंदन पुुरस्काराने सन्मानीत करण्यात अाले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी राेटरी क्लब बीड सेंट्रल चे अध्यक्ष अजय घोडके, सचिव सुशील अब्बड उपस्थित हाेते. 
स्वरश्री लाेळगे म्हणाले, माझ्या सतव्या वर्षांपासून मी संगीत कला जोपासली. १० हजार कुटुंबांच्या विवाह साेहळ्यात मंगलअष्टका म्हणाल्या आहेत. देशाबाहेर नेपाळमध्ये हिंदी भाषेमधून भक्ती गीते गायले. तिरुपती बालाजी संस्थान मध्ये संगीत साधना केली. विषेशम्हणजे दोन फुट अंतरावर बसून मला अभंग म्हणण्याची सेवा करण्याचा योग मिळाला. संगीत साधना ही अलौकीक असते. सत्संग, भक्ती, संस्कारातून पहिले माणूस व्हावे नंतर जीवन जगण्याचा खरा अर्थ समजेल. संत वृत्ती ही पोशाखवरून दिसत नसते. राहणीमान पेक्षा नैतिकता, परोपकाराचे विचार अंगी असणे गरजेचे असते म्हणूनतर संत हे सदृढ समाजव्यवस्थेचे सदगुरू म्हणून अाेळखले गेले अाहेत, असेही स्वरश्री लाेळगे यांनी सांगितले. 
याेगगुरु अॅड.  लाखे म्हणाले, कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, अर्थाजन करत सामज व कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे हे ज्या प्रमाणात भारत देशासाठी महत्वाचे अाहेत, त्याच प्रमाणे प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीचे अाराेग्य चांगले राहणे गरजेचे अाहे. बीड शहरातून योग दिंडी अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येकजन ला स्वत:च्या शरिराकडून १५ ते १८ तास काम करुन घ्यायचे असते परंतु त्या शरिराच्या उत्तम अाराेग्याची काळजी कशी घ्यायची हेच माहित नसते परिणामी अकाली वेगवेगळ्या घटनांना सामाेरे जावे लागते, हे सत्य अाहे. मानवी शरीर नावाची मशीन एकदम बिघडत नाही. त्यामुळे गाडीच्या सर्व्हीसींगप्रमाणे व्यायाम करणे आवश्यक आहे. १५ ते १८ तास काम करुनही शरिर निराेगी ठेवण्यासाठी २४ तासात किमान एक तास व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रदुषण, विषारी पदार्थ वर मत करण्यासाठी  योगा व प्राणायाम करावे. मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा नाही, ते सुंदर शरीर सुरक्षीत करणे महत्त्वाचे आहे. आयुष्य मंत्रालयातील योगा परीक्षा संदर्भात योगाचे ज्ञान बीड शहरातून शिकवले जाते. कोवीड काळात आम्ही ऑनलाईन योगा शिकवला. योगा व‌ प्राणायाम केल्याने कोरोनावर मत करण्यासाठी राेगप्रतिकार शक्ती वाढते, असेही याेगगुरु अॅड. लाखे यांनी सांगितले. 
या कार्यक्रमास प्रोजेक्ट चेयरमन अभिनंदन कांकरिया , कचरु चंभरे सर, संदेश लोळगे, गणेश वाघ, राजु संचेती, गिरीश गिल्डा, महेश जोशी, केदार जाजू , चंदू काळे, समाधान कुलकर्णी, प्रमोद कर्माळकर, संतोष बजाज, अतुल जाजु , रवीभाऊ उबाळे, विश्वास शेंडगे, अमोल लोणकर, सुहास बेद्रे,डॉ सचिन वारे यांच्यासह सर्व राेटरी क्लब बीड सेंट्रलचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित हाेते. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर तांबे यांनी केले तर अाभार सचिव सुशील अब्बड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा