Subscribe Us

header ads

विशेष निधीतील रस्ता नाली बांधकाम त्वरित सुरू करा -मोहम्मद खमरोद्दिन


बीड-: शहरातील बालेपीर भागातील रस्त्याच्या व नालीच्या दुरवस्था मुळे त्रस्त झालेल्या नाविक नागरिकांनी रस्ता व नाली दुरुस्तीसाठी आलेल्या विशेष अनुदानातील निधीतील काम त्वरित सुरू करावे अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद  खमारोद्दिन यांनी केली आहे. जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. की मी शहरातील बालेपीर परिसरातील फरशी कारखाना तोहिद मस्जिद चाऊस गल्ली इंदिरा गांधी विद्यालय जवळील सानप विद्यालय जवळील जाणारा रस्ता नालीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी खड्डे झाल्याने अत्यंत नालीतील घाण पाणी साचून संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याच रहदारी करणेही अवघड झाल्याने सदरील रस्ता व नाल्या काम नगरपालिका अंतर्गत प्रस्तावित असून यास वैशिष्टपूर्ण कामासाठी शासन निर्णयाद्वारे सन 2019 2020 करिता रुपये एक कोटी निधी शासनमार्फत मंजूर करण्यात आला असून नगर परिषद प्रशासनाने अद्याप सुरू केलेले नसल्याने याबाबत तत्काळ दखल घेत रस्ते व नाल्याची समस्या दूर करण्यासाठी विशेष अनुदाना अंतर्गत निधीतील कामे त्वरित करण्याचे आदेश नगर परिषद प्रशासनास देण्याची मागणी करण्यात आली यावेळी कलीम भाई शेख सलीम शेख इमरान शेख एजाज मोमीन अय्यर भाई मोहम्मद मोसिन इरशाद खान आधीची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा