Subscribe Us

header ads

दुचाकी चोरी करणारी टोळी अटक


 बीड-: बीड शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत होते.  मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांचे मागावर होते.  स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त केले.शनिवारी (दि. 24) गुप्त माहितीच्या आधारावर दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील सहा संशयितांना घेण्यात आले.तसेच त्यांच्याकडून 31 दुचाकी जप्त करण्यात आले. बीड शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या दुचाकी चोरीने  त्या भागातील पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. गेल्या महिनाभरापासून स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर दुचाकी चोरीच्या टोळीच्या मागे होते.आठ दिवसांपूर्वीच 24 दुचाकी हस्तगत केले होते.दोन चोरट्यांचे मुस्क्या बांधले होते. मात्र हा दुचाकी चोरीचा आकडा मोठ्या असल्याने एलसीबीची टीम या चोरट्यांची मागावर होते. वैभव संजय   वराट. सुयोग उर्फ छोट्या मच्छिंदर परधान.  संदीप उर्फ बबल्या हरिभाऊ कांडे. राजू मसु गोरे. तेजपाल विलास डोंगरे. बालाजी जीवनराव झेंडे या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 31 दुचाकी जप्त केले आहे.  त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राजाराम स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे  शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत व त्यांचे पथकाने केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा