Subscribe Us

header ads

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा


मुंबई, दि. 20 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 डोसे देण्यात आले आहेतअसे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले.

            देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख 99 हजार 339 तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 93 लाख 25 हजार 362 एवढी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख 20 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेलअसे डॉ.व्यास यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा