Subscribe Us

header ads

पुरग्रस्ताच्या मदतीसाठी मोमिनपुरा झोनमध्ये मदतफेरी 15 टन धान्य केले रवानाजमियत- उलेमा- ए- हिंद अर्शद मदनी संघटनेचा स्तुत्य उपक्रम

बीड (प्रतिनिधी) दि 4-: पुरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी जमियत- उलेमा-  ए- हिंद अर्शद मदनी या संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड शहरातील विविध भागातून येथून मोठी मदत गोळा करण्यात आली आहे. जमियत उलेमा ए हिंदचे (अर्शद मदनी) राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष हाफेज जाकेर सिध्दीकी यांच्यावतीने मोमीनपुरा झोनचे शाखाध्यक्ष हजरत मोहसीन मौलाना व त्यांच्या सहकार्‍यांनी मोमिनपुरा, ढगे कॉलनी, अशोकनगर आदी भागातून 15 टन धान्य, कपडे आणि रोख स्वरुपात निधी जमा करण्यात आला आहे.
बीड शहरातील मोमिनपुरा भागात राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष जाकेर मौलाना यांच्यासह सदस्यासह मोमिनपुरा झोन शाखेचे अध्यक्ष हजरत मोहसिन मौलाना व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यामध्ये  शेख वजीर चाँद, शेख बाबू, चाँद, शेख रिजवान, शेख सोहेल युसूफ, हाफेज आशफाक लिडर, शेख हसन, शेख कैसर, शेख तोहील, शेख अमेर, शेख शामिर, शेख जोहर, शेख आयान, पठाण सैफ, शेख इबाद, शेख परवेज, शेख नदीम, शेख सोहील नासेर, शेख फैजान, शेख अरिब, पठाण सोहेल, शेख शोहेब, शेख उमेर, शेख आतेफ, शेख फजल, शेख समीर, शेख मोहसीन, आदींची उपस्थिती होती.
पुरग्रस्त नागरिकांसाठी जमा करण्यात आलेली मदत ट्रकव्दारे तात्काळ पाठविण्यात आली असून संघटनेचे कार्यकर्ते पुरग्रस्त भागातील पाहणी करून वाटप करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा