Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्याचे सुपूत्र टोकीयो-ऑलिंम्पिक - 2020 चे खेळाडू श्री. अविनाश साबळे यांचा जिल्हाधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा यांचे हस्ते सत्कार संपन्न

बीड,दि.30 (जि.मा.का.):- बीड जिल्ह्याचे सुपुत्र टोकीयो - 2020 ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताच्या वतीने 3000 मीटर स्टीपलचेस ( अडथळा ) धावणे स्पर्धेत सहभाग घेवून उत्कृष्ट कामगिरी केलेले खेळाडू श्री. अविनाश साबळे यांचे बीड जिल्ह्यात आगमण होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस ह्या राष्ट्रीय क्रीडा दिनांचे औचित्य साधून जिल्हाधिकारी यांचे निवासस्थानी जिल्हाधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा यांचे हस्ते शॉल, बुक्के व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. विक्रम सारूक, उपशिक्षणाधिकारी श्री. भगवानराव सोनवणे, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती. सुप्रिया गाढवे व क्रीडा संघनेचे पदाधिकारी, श्रीमती. डॉ कविता कराड ( गित्ते ), श्री. उध्दव कराड, प्राचार्य श्री. विश्वास कदम, श्री. अभिजीत तांदळे, श्री. गोपाळ धांडे, श्री. तत्वशिल कांबळे, श्री. शरद आंदुरे, श्री. योगेश साबळे उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर यांनी मा. श्री. अविनाश साबळे यांचा व उपस्थितांचा परिचय मा. जिल्हाधिकारी यांना करून दिला.

            यावेळी जिल्हाधिकारी मा. श्री. राधाबिनोद शर्मा यांनी मा. श्री. अविनाश साबळे यांचा शाळा ते ऑलिंम्पिक स्पर्धे पर्यंतचा प्रवास जाणून घेतला व त्यांची ही यशोगाथा जिल्ह्यातील नवीन खेळाडूंना प्रेरणा म्हणून उपलब्ध व्हावी करिता जिल्ह्यातील विविध संस्थातून त्यांचे क्रीडा व शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शन आयोजित करावे असे सुचित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा