Subscribe Us

header ads

रस्ते केल्याचे श्रेय सारेच घेतात,खड्ड्यांचे श्रेय कोण घेणार?भाजप नेते सर्जेराव तांदळे यांचा सवाल; श्रेय घेणारांना देणार 51 हजाराचे बक्षीस

बीड, प्रतिनिधी : खड्ड्यात रस्ते की, रस्त्यावर खड्डे? असा प्रश्‍न पडावा, एवढी जिल्हाभरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नेहमी आम्ही निधी आणला, आम्ही रस्ता केला म्हणत श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते. रस्ता केल्याचे श्रेय घेणारे आता खड्ड्यांचेही श्रेय घेणार का? असा रोखठोक सवाल उपस्थित करत एखादा नेता, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार, इंजिनिअर खड्ड्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आला तर त्याला ईमानदारीचे पारितोषीक म्हणून 51 हजार रूपयांचे बक्षीस भाजपनेते सर्जेराव तांदळे यांनी जाहीर केले आहे.
बीड शहरासह जिल्ह्यातील सर्व राज्य रस्ते, प्रमुख मार्ग, गाव रस्ते खड्डेमय बनले आहेत. या खड्ड्यामुळे अनेकांना अपाला जीव गमवावा लागला आहे. कित्तेकांचे हात- पाय मोडून कायमचे अपंगत्व आले. हजारो लोकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनक्याचे आजार जडले आहेत. जीकडे तिकडे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. सारा बीड जिल्हा खड्डेमय रस्त्यांची राजधानी बनला आहे. एरवी रस्ता, ईमारत, नाली असो या संडास रूमचे बांधकाम, सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते यांची श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागते. आम्हीच रस्ता मंजूर केला, आम्ही निधी आणला, आमच्यामुळेच रस्ता होत आहे, अशी पत्रके निघतात. एखादे काम होत असताना श्रेयासाठी अक्षरशा भांडणे लागण्याची वेळ येते. अगदी छोट्या गावातील वस्तीवरच्या रस्त्यापासून ते जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरातील मोठ्या रस्त्यापर्यंत श्रेयासाठी सारेच पुढे येतात. नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी श्रेय घेतलेल्या त्याच रस्त्यांची आज कमालीची दुरावस्था झाली आहे. बीड जिल्हा खड्डेमय रस्त्यांचे माहेरघर बनले आहे. कुठे घुडघ्याएवढे तर कुठे कमरेएवढे खोल आणि काही मिटर लांबी- रूंदीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहनधारक तर बेजार आहेतच मात्र पायी चालणारे लोकही त्रस्त झाले आहेत. वाहने खिळखिळी बनत आहेत. रस्ते बनवल्याचे श्रेय घेण्यासाठी सारेच पुढे येतात मग खड्ड्यांचे श्रेय कोणाचे? काम झाल्यानंतर वर्ष- सहा महिन्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना जवाबदार कोण? श्रेयासाठी नेहमी भांडणार्‍या लोकांनी आता नैतिकता दाखवत खड्ड्याचेही श्रेय घ्यावे, असे आवाहन भाजप नेते अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांनी केले आहे.
राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधकाम विभागाचे अभियंता यापैकी कोणीतरी खड्ड्यांचे श्रेय घेण्यासाठी पुढे यावे. नितिमत्ता दाखवून खड्ड्यांचे श्रेय घेण्यासाठी पुढे आलेल्या सबंधिताला स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी 51 हजार रूपयांचे पारितोषीक देऊन विशेष सत्कार करू असे अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांनी जाहीर केले आहे.

रस्त्याचे काम करणारे नेते, कंत्राटदार, अभियंते यांनी काम केल्याचे प्रमाणित करून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना मी जवाबदार आहे, असे प्रमाणिकपणे सांगावे. प्रामाणिक पणाचा गौरव म्हणून सबंधित नेता, कंत्राटदार, अभियंता याचा जाहीर कार्यक्रमात 15 ऑगस्ट रोजी 51 हजार रूपयाचे पोरितोषीक देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. रस्ता केल्याचे श्रेय घेण्यासाठी जसे सारेच पुढे येतात. तसे आता निकृष्ट रस्ता कामास जवाबदार असलेल्या लोकांनी पुढे यावे.
-अ‍ॅड. सर्जेराव तांदळे

*ऊसाच्या बीलाचे पैसे बक्षीस म्हणून देणार*

खड्ड्यांचे श्रेय घेण्यासाठी पुढे आलेल्या प्रामाणिक गुत्तेदार, नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, ईंजिनिअर यांना 51 हजार रूपयांचे रोख बक्षीस देत आहे. या बक्षीसाची रक्कम ऊसाच्या बीलाचे पैसे असणार आहेत. माझ्या शेतातील ऊसाचे आलेले पैसे बक्षीस म्हणून देणार असल्याचे अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा