Subscribe Us

header ads

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी सिरसाळा (ता.परळी) येथील तरुणाला अटक

बीड-: पंधरा महिन्यांपूर्वी समाज माध्यमातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीजनक टिपणी केल्याप्रकरणी सिरसाळा (ता.परळी) येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्या तरुणाने स्वत: आत्मसमर्पण केल्याने पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. आहे  जिल्ह्यातील सिरसाळा(ता.परळी) येथे फैसल खान युसुफजई (वय २०) याचे परळीत मोबाइलचे दुकान आहे. पंधरा महिन्यापूर्वी त्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल समाज माध्यमातून बदनामीकारक टिपणी प्रसारित केली होती. ही टिपणी कोविडच्या अनुषंगाने केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अहमदाबाद शहर सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के. मोदी यांनी फैसल खान याच्याविरुध्द १८ एप्रिल २०२० रोजी जनतेत भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखाद्या वर्गाला दुखावण्याच्या हेतूने प्रेरित करणारा मजकूर असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य  गुन्ह्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमान्वये त्याच्याविरुध्द कारवाई करण्यात आली होती. तब्बल पंधरा महिन्यानंतर अहमदाबाद सायबर गुन्ह्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यात येऊन फैसल खान यास नोटीस बजावली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा