Subscribe Us

header ads

भाच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे ममता बॅनर्जी संतप्त!

दिल्ली-: केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसशी लढण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे कारण ते पक्षाशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला. बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी तसंच त्यांच्या पत्नी रुजीरा यांना कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. याच मुद्द्यावरुन ममता बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, आमचे प्राधान्य लोकांसाठी काम करणे आहे. जेव्हा दिल्लीतील भाजपा सरकार राजकारणात आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा ते तपास यंत्रणांचा वापर करतात. काही लोक आम्हाला सोडून गेले होते पण आता ते परत आले आहेत कारण त्यांना माहित आहे की हा पक्ष हेच त्यांचे घर येथे आहे.कालीघाट येथे तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित करत होत्या.भाजपचे मंत्री कोळसा माफियांच्या हाताशी आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात असा सूडबुद्धीने चालणारा पक्ष आणि सरकार कधीच पाहिलं नाही. तुम्ही आम्हाला ईडीचा धाक दाखवल्यास, आम्ही भाजपा नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावेही पाठवू, असंही त्या म्हणाल्या.राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि इतर सर्व आयोग राजकीय झाले आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य भाजपचे आहेत, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे.मतदानोत्तर हिंसाचारात ५ भाजप कार्यकर्ते आणि १६ टीएमसी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. आम्हाला सीबीआयची काहीच अडचण नाही, पण ते भाजप नेत्यांना त्यांच्यासोबत खेड्यापाड्यात का घेऊन जात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजपाला वाटते की ते ईडीचा वापर करून आमच्यावर दबाव आणू शकतात परंतु आम्ही अधिक मजबूत होऊ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा