Subscribe Us

header ads

चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णसेवेेचे तिन-तेरा अधिकारी-कर्मचार्‍यांचा बेजबाबदारपणा, रूग्णांचे हाल

बीड दि.28(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा आणि सततच्या गैरहजरीमुळ रूग्णांना नियमितपणे उपचार होत नाहीत. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे याठिकाणी आहेत ते कर्मचारी दिलेल्या वेळेनुसार रूग्णालयात थांबत नाहीत. सदर प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेऊन रूग्णसेवा नियमित देण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आपली जबाबदारी योग्यप्रकारे निभावत नाहीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णाची हेळसांड होते. पूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रात 150 बाह्यरूग्ण उपचारासाठी येत असत. सुविधा मिळत नसल्याने सध्या 10 ते 15 रूग्ण येतात. मागील काही दिवसांपासून ओपीडी नोंद व औषध देण्याची काम शिपाईच करत आहेत. अत्यावाश्यक अपघात आणि डिलेवरीच्या उपचारासाठी संबंधित कर्मचारी टाळाटाळ करून गावातील एका खाजगी रूग्णालयात जाण्यास भाग पाडतात. तसेच वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती नसते त्यामुळे डॉक्टर व कर्मचारी म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी झाली आहे.
कोरोणा महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व सामान्यच उत्पन्न कमी झाले आहे. त्याताच चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना उपचार होत नाहीत, या प्रकरणी दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी समाजसेवक एस.के.देशमुख यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती अध्यक्ष जिल्हा परिषद बीड, सभापती आरोग्य विषय समिती जिल्हा परिषद बीड, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा